Devendra Fadnavis in Bihar, Chair broke Incident : बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील निवडणूक प्रचारादरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) व्यासपीठावर बसले. मात्र, यावेळी खुर्ची अचानक तुटल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दोघेही खाली कोसळले होते. यामुळे काही क्षणांसाठी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. फडणवीस आणि पासवान दोघेही लगेच सावरले आणि त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले आणि आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. तात्काळ नवीन खुर्ची आणून कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय. बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीस महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी एनडीएचा प्रचार जोर धरू लागला आहे. रविवारी खगडिया जिल्ह्यातील परबत्ता मतदारसंघात एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्य यांच्या समर्थनार्थ झालेल्या सभेत हा प्रकार घडला. फडणवीस आणि पासवान हे मंचावर पोहोचले आणि बसण्याच्या क्षणी खुर्ची तुटल्याने उपस्थितांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि आयोजकांनी नवीन खुर्च्या आणून कार्यक्रम पुन्हा सुरू केला. या प्रसंगाकडे फडणवीस आणि पासवान यांनी विनोदी पद्धतीने पाहिले आणि लोकांना अभिवादन करत भाषणास सुरुवात केली.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बिहारमधील जनतेला आता प्रगती आणि विकास हवा आहे, आणि एनडीएच ती दिशा दाखवू शकते. महागठबंधनने फक्त भ्रष्टाचार आणि घराणेशाही वाढवली आहे.” तर चिराग पासवान यांनी म्हटले, “महागठबंधन हे सत्तेच्या लालसेत तयार झालेले संधीसाधू एकत्रीकरण आहे, ज्यांना जनतेच्या हिताची काहीही काळजी नाही.”
या छोट्याशा अपघातानंतरही सभास्थळी उपस्थितांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हजारो समर्थकांनी “एनडीए झिंदाबाद”च्या घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, खुर्ची तुटल्याचा आवाज होताच क्षणभर भीती निर्माण झाली, पण नेत्यांच्या शांत आणि हसतमुख स्वभावामुळे परिस्थिती लगेचच सामान्य झाली. कार्यक्रमानंतर या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. काही नेटकर्यांनी आयोजकांच्या निष्काळजीपणावर टीका केली. अशा सभा व्यवस्थापनातील चुका भविष्यात अधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित करतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारेंची माफी मागितली, नेमकं काय म्हणाले?
ADVERTISEMENT











