रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारेंची माफी मागितली, नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

Ranjitsinh Naik Nimbalkar apologized to Sushma Andhare : रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारेंची माफी मागितली, नेमकं काय म्हणाले?

ADVERTISEMENT

Ranjitsinh Naik Nimbalkar apologized to Sushma Andhare :
Ranjitsinh Naik Nimbalkar apologized to Sushma Andhare :
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारेंची माफी मागितली, नेमकं काय म्हणाले?

point

मी मनोमीलन करण्यास नकार दिल्याने रामराजेंनी हे षडयंत्र रचले

Ranjitsinh Naik Nimbalkar apologized to Sushma Andhare, सातारा : फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांनी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये सभा घेत प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी मोठ्या स्क्रीनवर कागदपत्रही सादर केले. यावेळी महिलांची मोठी गर्दी होती. महिलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे पाय धुतले. मिहलांनी नाईक निंबाळकर यांचे पाय धुतले आणि दृष्ट देखील काढली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.

हेही वाचा : 'मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल पण...', शिंदेंच्या मराठी आमदारने उडवली खळबळ

दरम्यान, यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारेंची माफी मागितली आहे. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, माझ्या भगिनी सुषमा ताई याठिकाणी आल्या. त्यांनाही आपण आजच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण दिलं होतं. त्यांच्याविषयी कोणी अपशब्द वापरले असतील तर मी त्यांची माफी मागतो. त्या महाराष्ट्राच्या भगिनी आहेत. मी जाहीर व्यासपीठावरुन त्यांची क्षमा मागतो. ते आपले संस्कार नाहीत. आपली संस्कृती नाही. आपण राजकारणात आल्यानंतर आपलं चरित्र हे पब्लिक कॅरेक्टर असतं. लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. तो कोणालाही आहे.

यावेळी नाईक निंबाळकरांनी आरोप फेटाळून लावले. विरोधकांवर जोरदार टीका केली. आपल्यावर करण्यात आलेले आरोप मास्टरमाईंडच्या सांगण्यावरुन करण्यात आले आहेत. मी नार्को टेस्टला तयार आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांही त्यासाठी तयार राहावं.  मला गोळी घातली तरी चाललं असतं, पण किती बदनामी करता? असा सवालही केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp