नवी मुंबईच्या नेरुळ येथील डी.वाय.पाटील संस्थेत कामाला लावण्यासाठी शरिरसुखाची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळ येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये एका गरजु महिलेने नोकरीसाठी अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. सुरुवातीला या महिलेने प्रतिसाद न दिल्यामुळे हा व्यक्ती वारंवार पीडित महिलेला फोन करुन, माझी पत्नी नसल्यामुळे शरीरसुखासाठी दबाव टाकायला लागला.
पीडित महिलेला आरोपीने शरीरसुखाच्या मोबदल्यात स्वीय सहाय्यक म्हणून नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर महिलेने ही कैफीयत मनसेचे स्थानिक पदाधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या कानावर घातली. यानंतर महिलेने आरोपीला वाशी येथील एका लॉजवर बोलवलं असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
Pune Crime : गुन्हे करुन त्याचा उपयोग करायचा कथा लेखनासाठी; लेखकाला सायबर पोलिसांनी केली अटक
ADVERTISEMENT
