मुंबई : मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी घोषित केलेली ‘से नो टू हलाल’ ही मोहिम मनसेची अधिकृत भूमिका नसल्याचे मनसेचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काल पत्रकार परिषद घेवून आक्रमकपणे भूमिका जाहीर करणारे यशवंत किल्लेदार यांच्या मोहिमेतील हवाच निघाली आहे. आज नवी मुंबईमध्ये बोलताना बाळा नांदगावकर यांनी याबाबत भाष्य केले.
ADVERTISEMENT
नांदगावकर म्हणाले, आमच्या एका कार्यकर्त्याने ती मागणी केली आहे, मात्र ‘से नो टू हलाल’ ही पक्षाची भूमिका नाही. जोपर्यंत पक्षप्रमुख एखादी मागणी करत नाहीत तोपर्यंत ती पक्षाची भूमिका होत नाही. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे उचित नाही. एखादा कार्यकर्ता कुठेतरी पत्र देतो आणि त्यावर आम्ही भाष्य करणे हे उचित नाही, असेही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
Shivsena : ठाकरेंकडून दोन निष्ठावंत मावळ्यांना प्रमोशन : पराग डाकेंवरही नवी जबाबदारी
यशवंत किल्लेदार हलाल विरोधात आक्रमक
दरम्यान काल यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषद घेवून या मोहिमेची घोषणा केली होती. किल्लेदार म्हणाले होते, हलाल ही मुस्लिम धर्मियांकडून बकऱ्याला कापण्याची ही क्रूर पद्धत आहे. ऐवढचं नाही तर मक्क्याकडे तोंड करून त्यांची कत्तल होते. 15 टक्के मुस्लिम धर्मियांची ही पद्धत 85 टक्के लोकांवर का लादायची. हा मुद्दा फक्त धार्मिक मुद्दा नाही तर अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम याकडे आम्ही पाहत आहोत. याचे पैसे अतिरेक्यांच्या न्यायालयील खटल्यांसाठी वापरले जातात. यासाठी जनजागृती म्हणून ‘नो टू हलाल मोहीम’ ही चळवळ उभी करणार आहोत.
सरकारने एकदा का त्यांना या गोष्टी आयात व निर्यातीला परवानगी दिली की, इतर पदार्थही याद्वारे पाठवले जात आहे. हिंदू, शीख, ख्रिस्ती धर्मीय झटका पद्धतीचे मांस खातात. मूळ मांसासाठी असणारे हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, रुग्णालय यांच्यासह मॅकडोनाल्ड, केएफसी, या कंपन्यांनी घेतले आहे. बाजारात हलालचे मटण घेण्यावर दबाव वाढत आहे. मात्र झटका मटणाला विरोध होत आहे.
खैरेंचा पहिल्यांदा सत्कार झाला अन् शिरसाटांचा इगो दुखावला : जलील, सावेंची मध्यस्थी
हलालमुळे हिंदू खाटीक वाल्मिकी समाजास रोजी रोटी मिळत नाही. हलाल ही पद्धत मुस्लिमांना पाहिजे तर त्यांनी ठेवावी पण ती इतरांवर लादू नये. आम्ही येत्या काळात पत्रक काढू, ज्या कंपन्या आहेत त्यांना माहिती देऊ. पत्र देऊनही ऐकले तर ठिक न एकल्यास संबधित कंपनींना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. येत्या काळात व्यापार्यांच्या असोसिएशनचीही बैठक घेऊन त्यांना मुद्दा स्पष्ट करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
ADVERTISEMENT











