Baramati assembly by-election : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघात मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात मोठी पोकळी निर्माण झालीये. राज्याने अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष तर गमावला. शिवाय, बारामतीतील जनतेने त्यांचा आमदार देखील गमावलाय. बारामतीला आता नव्या नेतृत्वाची देखील गरज असणार आहे. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक कधी होणार असा सवाल विचारण्यात येत होता. या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडूनच मिळालं आहे. त्यामुळं आता बारामतीतून अजितदादांच्या नंतर कोण आमदार होणार? निवडणूक होणार का? आणि झाली तर कधी होणार? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात...
ADVERTISEMENT
तर सर्वात आधी बारामती पोटनिवडणूकीची तयारी सुरु झालीय का? या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. प्रशासनानं यासंदर्भातील तयारी सुरु झाली असल्याची हिंट दिलीय. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. हा कार्यक्रम काय आहे हे आधी बघुयात.
पुणे जिल्ह्यातील 201–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अन्वये 201–बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
हेही वाचा : प्रियकरासोबत पळून जाऊन लग्नं केलं, दहा महिन्यांतच केली आत्महत्या; तरुणीने का उचललं टोकाचं पाऊल?
हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकावर आधारित असेल. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्या 6 मार्च 2026 पर्यंत निकाली काढण्यात येणार असून, अंतिम मतदारयादी मंगळवार, 10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचना-आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
आता हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दादांच्या जागी कोण? हा प्रश्नही उपस्थित होईल. तर अर्थातच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारच बारामतीच्या आमदार होणार हे जवळपास निश्चित आहे. शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्यांना दोन्हीपैकी एका सभागृहाची शपथ घेणं आवश्यक आहे. त्यामुळं त्याच इथून आमदार होऊ शकतात. दुसरं म्हणजे निवडणूक कधी होणार? तर अंतिम मतदारयादी 10 मार्चला आल्यानंतर साधारण मार्च किंवा एप्रिलमध्ये ही निवडणूक होऊ शकते असा अंदाज आहे.
आता निवडणूक होईल की बिनविरोध हे पाहणंही महत्त्वाचं आहे. कारण दादांच्या विरोधात युगेंद्र पवार हे पक्ष फुटल्यानंतर लढले होते. मात्र आता दादांच्या निधनानंतर पवार कुटुंबातून सुनेत्रा पवारांच्या विरोधात कुणी असेल अशी किंचितही शक्यता नाही. शिवाय दुसरीकडे भाजप किंवा शिवसेनेकडूनही इथे उमेदवार दिला जाण्याची शक्यता नाहीच. विरोधी पक्षातून कुणी इथे दादांच्या निधनामुळं उमेदवार देईल असं दिसत नाही. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोधच होईल असं विश्लेषकांचं मत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











