मुन्नाभाईचं काळीज समजायला ‘मामूला’ सात जन्म घ्यावे लागतील गेट वेल सून मामू! मनसेचं उत्तर

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा उल्लेख हा गटप्रमुखांच्या भाषणात मुन्नाभाई असा केला होता. त्यावर आता मनसेने उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचा उल्लेख मामू असा करण्यात आला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला खरमरीत उत्तर दिलं आहे. मुन्नाभाईचं काळीज समजायला मामूला सात जन्म घ्यावे लागतील असं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे. Uddhav […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:05 AM • 23 Sep 2022

follow google news

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा उल्लेख हा गटप्रमुखांच्या भाषणात मुन्नाभाई असा केला होता. त्यावर आता मनसेने उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचा उल्लेख मामू असा करण्यात आला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला खरमरीत उत्तर दिलं आहे. मुन्नाभाईचं काळीज समजायला मामूला सात जन्म घ्यावे लागतील असं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

Uddhav Thackeray: मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना आणि ठाकरे घराणं संपवायचं आहे

काय आहे गजानन काळे यांचं ट्विट?

आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला.मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील.

गेट वेल सून मामू

असं म्हणत मनसेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता भाजपच्या लोकांनी मुन्नाभाईला सोबत घेतलंय अशी टीका त्यांच्या भाषणात केली होती. बुधवारी झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचा उल्लेख मुन्नाभाई असा केला होता. त्यानंतर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना खरमरीत उत्तर दिलं आहे. तसंच राज ठाकरे यांनी कसा मनाचा मोठेपणा दाखवला याची उदाहरणंही दिली आहेत. मनसेचे गजानन काळे यांचं हे ट्विट चर्चेत आहे.

उद्धव ठाकरेंनी भाषणात नेमकं काय म्हटलं होतं?

शिवसेनेला संपवण्यासाठी सगळेजण एकत्र येत आहेत. मी चार दिवसांपूर्वीच मी बोललो होतो की मी आजच्या दिवसाची वाट बघत होतो. ज्यांना कुणाला अंगावर यायचं आहे या तुम्हाला आस्मान काय असतं ते दाखवतो. या एकत्र या, तुमच्या लक्षात आणून देतो की शिवसेनेची ताकद तुम्हाला कळली नाही, पण विरोधकांना कळली आहे. त्यामुळेच शिवसेना संपवण्यासाठी आपल्यातल्या गद्दारांना सोबत घेतलं आहे, मुन्नाभाई सोबत घेतलाय. सगळे एकत्र कशासाठी येत आहेत तर उद्धव ठाकरेला संपवा, ठाकरे घराणं संपवा आणि शिवसेना संपवा. हे समोर बसलं आहे ते माझं ठाकरे कुटुंब आहे संपवा. प्रत्येकाच्या हृदयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेलेली असतील माझ्या शिवसैनिकांची मनं थिजलेली नाही.

१४ मेच्या भाषणात राज ठाकरेंचा मुन्नाभाई असा उल्लेख करत काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“मला मध्यंतरी एका शिवसैनिकाने विचारलं, साहेब तुम्ही तो लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं संबंध काय? लगे रहोचा… मी थोडासा पाहिलाय. तर तो मला म्हणाला की त्यात नाही का संजय दत्तला गांधीजी दिसतात. गांधीजी त्याच्याशी बोलतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं हां मग… ? तर तो मला म्हणाला की तशी एक केस आहे आपल्याकडे. मी म्हटलं अशी कोणती केस? तर तो म्हणाला अहो ती नाही का? ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. “

“शाल घेऊन फिरतात. कधी मराठीच्या नादाला तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. मी त्याला म्हटलं की अरे त्या सिनेमातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढलास? तर तो मला म्हणाला तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही पाहिला. त्यात शेवटी त्या संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे. तर ही केमिकल लोच्याची केस आहे. असे मुन्नाभाई फिरत आहेत फिरूद्या.

    follow whatsapp