चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्सप्रेस’ निघाली कोकणात!

1 हजार 800 गणेशभक्तांसाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी दादरहून स्पेशल ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन सोडली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. अशावेळी भाजप आमदार नितेश राणेंनी कोकणवासियांसाठी ही खास सुविधा केली आहे. यावेळी संपूर्ण ट्रेनच नितेश राणेंनी बुक केली आहे. यामध्ये नोंदणी केलेल्या प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. नारायण राणे यांना […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:47 AM • 07 Sep 2021

follow google news

हे वाचलं का?

1 हजार 800 गणेशभक्तांसाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी दादरहून स्पेशल ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन सोडली आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. अशावेळी भाजप आमदार नितेश राणेंनी कोकणवासियांसाठी ही खास सुविधा केली आहे.

यावेळी संपूर्ण ट्रेनच नितेश राणेंनी बुक केली आहे. यामध्ये नोंदणी केलेल्या प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे.

नारायण राणे यांना नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे, त्यामुळेच PM मोदींचे आभार मानण्यासाठी नितेश राणेंनी ‘मोदी एक्सप्रेस’ सोडली आहे.

‘या वर्षी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करण्यासाठी मी यावेळी बसेस सोडत नाही तर मी पूर्णच्या पूर्ण ट्रेन सोडतोय.’ असं नितेश राणे म्हणाले आहेत.

7 सप्टेंबर 2021 रोजी या विशेष ‘मोदी एक्सप्रेस’ला केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी दादर स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवला. ज्यानंतर ही ट्रेन कोकणाच्या दिशेने रवाना झाली.

    follow whatsapp