ADVERTISEMENT
मोक्षदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांनी सजवण्यात करण्यात आली.
देवाचा गाभारा, सोळा खांभी मंडप, चौखांभी मंडप आदी ठिकाणी आकर्षक नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.
या सजावटीसाठी 600 किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते.
या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते.
एकादशी ही विष्णूची तिथी असून, या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात.
या वर्षी 13 डिसेंबर सोमवारी रात्री 9 वाजून 32 मिनिटांपासून एकदशी सुरू झाली.
एकादशी तिथी दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजून 35 मिनिटापर्यंत राहणार आहे.
मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर सजावण्यात आलं असून, विठ्ठल-रुखमाईचं रुम डोळ्यात साठवून ठेवावं इतकं सुंदर दिसत आहे.
विठ्ठल रुखमाईलाही नवीन वस्त्र नेसवण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT












