Mood Of The Nation : देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती? काय सांगतो इंडिया टुडेचा सर्व्हे?

मुंबई तक

• 03:30 PM • 20 Jan 2022

देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांचा रणगसंग्राम हा पुढच्या महिन्यात रंगणार आहे. अशात इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी देशाचा कल काय आहे? लोकांना काय काय वाटतं? मोदी सरकारविषयी काय वाटतं? या सगळ्या गोष्टी लोकांशी बोलून जाणून घेतल्या आहेत. 2024 हे वर्षही निवडणुकीचं वर्ष असणार आहे. कारण या वर्षात देशात लोकसभेची निवडणूक […]

Mumbaitak
follow google news

देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांचा रणगसंग्राम हा पुढच्या महिन्यात रंगणार आहे. अशात इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी देशाचा कल काय आहे? लोकांना काय काय वाटतं? मोदी सरकारविषयी काय वाटतं? या सगळ्या गोष्टी लोकांशी बोलून जाणून घेतल्या आहेत. 2024 हे वर्षही निवडणुकीचं वर्ष असणार आहे. कारण या वर्षात देशात लोकसभेची निवडणूक रंगणार आहे.

हे वाचलं का?

मोदींच्या विरोधात आघाडी करण्यासाठी दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी महाराष्ट्रात शरद पवार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि इतर राज्यांमधळे इतर नेते सगळ्या विरोधी गटांची मोट बांधता येते का? याच्या सगळ्या शक्यता पडताळून पाहात आहेत. काँग्रेसला घेऊन किंवा वगळून तिसरी आघाडी उभी राहिल का? याचाही सविस्तर उहापोह होत असल्याचं गेल्या काही महिन्यांमध्ये पाहायला मिळालं.

लोकांनी जरी मोदींना बदललं तरीही पुढची दशकं BJP राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार – प्रशांत किशोर

अशात इंडिया टुडे आणि सी व्होटर्सचा हा सर्व्हे महत्त्वाचा आहे. यामध्ये आम्ही लोकांना एक प्रश्न विचारला होता की भारताचे पुढचे पंतप्रधान म्हणून अर्थात 2024 च्या निवडणुकीनंतर जे पंतप्रधान होतील ते कुणाला बघायला आवडेल. जाणून घेऊ लोकांनी कुणाला सर्वाधिक पसंती दिली आहे. या प्रश्नाला काय उत्तर देण्यात आलं याची जानेवारी 2021, ऑगस्ट 2021 आणि जानेवारी 2022 या तिन्ही सर्व्हेची टक्केवारी आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत.

भारताचे 2024 नंतरचे पंतप्रधान म्हणून कोणाला बघायला आवडेल?

कुणाच्या नावाला किती पसंती दिली आहे?

नरेंद्र मोदी

जानेवारी 2022 -52.5 टक्के

ऑगस्ट 2021-24 टक्के

जानेवारी 2021-38 टक्के

राहुल गांधी

जानेवारी 2022 -6.8 टक्के

ऑगस्ट 2021-10 टक्के

जानेवारी 2021-7 टक्के

योगी आदित्यनाथ

जानेवारी 2022 -5.7 टक्के

ऑगस्ट 2021-11 टक्के

जानेवारी 2021-10 टक्के

अमित शाह

जानेवारी 2022 -3.5 टक्के

ऑगस्ट 2021-7 टक्के

जानेवारी 2021-8 टक्के

प्रियांका गांधी

जानेवारी 2022 -3.3 टक्के

ऑगस्ट 2021-4 टक्के

जानेवारी 2021-3 टक्के

नितीन गडकरी

जानेवारी 2022 -3.2 टक्के

ऑगस्ट 2021-7 टक्के

जानेवारी 2021-1 टक्के

अरविंद केजरीवाल

जानेवारी 2022 -3.1 टक्के

ऑगस्ट 2021-8 टक्के

जानेवारी 2021-5 टक्के

सोनिया गांधी

जानेवारी 2022 -3 टक्के

ऑगस्ट 2021-8 टक्के

जानेवारी 2021-4 टक्के

ममता बॅनर्जी

जानेवारी 2022 -2.6 टक्के

ऑगस्ट 2021-8 टक्के

जानेवारी 2021-4 टक्के

पी चिदंबरम

जानेवारी 2022-1.9 टक्के

संपूर्ण सर्व्हेवर नजर टाकली तर देशाचा मूड अजूनही हेच सांगतो आहे की 2024 नंतरही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील. जानेवारी 2021 आणि ऑगस्ट 2021 या महिन्यांमध्ये घेण्यात आलेली टक्केवारी कमी अधिक प्रमाणात असली तरी क्रमांक एक मोदींचाच आहे. जानेवारी 2022 मध्ये 52.5 टक्के जनतेने हीच पसंती दर्शवली आहे की मोदी हेच पुढचे पंतप्रधान असतील.

    follow whatsapp