महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज

मुंबई तक

• 04:26 PM • 11 Jun 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 104 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 56 लाख 16 हजार 857 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.4 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात 11 हजार 766 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्रात आज दिवसभरात 406 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची […]

Mumbai Tak
Google CTA

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 104 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 56 लाख 16 हजार 857 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.4 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात 11 हजार 766 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात आज दिवसभरात 406 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातला मृत्यू दर आज घडीला 1.81 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 76 लाख 11 हजार 5 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 87 हजार 853 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला 10 लाख 4 हजार 770 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 6 हजार 204 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आज दिवसभरात 11 हजार 766 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 58 लाख 87 हजार 853 इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 406 मृत्यूंपैकी 273 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 133 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 2213 ने वाढली आहे. हे 2213 मृत्यू, पुणे-546, ठाणे-398, अहमदनगर-291, नाशिक-194, नागपूर-160, बीड-129, सातारा-53, चंद्रपूर-49, बुलढाणा-46, नांदेड-45, पालघर-40, सांगली-39, जालना-34, रत्नागिरी-28, यवतमाळ-25, लातूर-20, नंदूरबार-18, रायगड-14, भंडारा-11, अकोला-10, परभणी-10, गोंदिया-8, धुळे-6, जळगाव-6, औरंगाबाद-5, हिंगोली-5, उस्मानाबाद-5, सिंधुदुर्ग-5, सोलापूर-5, कोल्हापूर-4, अमरावती-2 आणि गडचिरोली-2 असे आहेत.