मुंबईच्या कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची घरगुती वादातून त्यांच्यात पत्नी आणि मुलीने हत्या केली आहे. घरातल्या खलबत्त्याने ठेचून ही हत्या करण्यात आली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील पावशेनगर इथे ही घटना घडली असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत पत्नी आणि मुलीला अटक केली आहे. कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रकाश बोरसे हे कल्याण पूर्वेला कोळसेवाडी भागात आपली पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्रीसोबत रहायचे. भाग्यश्रीचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, परंतू ती आपल्या पतीसोबत नांदत नसल्यामुळे प्रकाश यांचा वारंवार या विषयावरुन वाद व्हायचा.
85 व्या वर्षी वडिलांनी विवाह मंडळात नाव नोंदवलं म्हणून मुलाने वरंवटा डोक्यात घालून केलं ठार
गुरुवारी संध्याकाळी घरी आल्यानंतर बोरसे यांचा याच विषयावरुन आपली पत्नी आणि मुलीशी वाद सुरु झाला. या भांडणातून दोघींनी घरातल्या खलबत्त्याने ठेचून प्रकाश यांची हत्या केली. प्रकाश यांचा जागेवरच मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी व मुलगी घराचा दरवाजा बंद करुन एका कोपऱ्यात बसून होत्या. जवळपास चार तास मायलेकी बसून राहिल्यानंतर शेजारच्यांना या गोष्टीचा पत्ता लागला. ज्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत दोघींना अटक केली आहे.
पुण्यात 85 वर्षांच्या वडिलांची चाकूचे वार आणि डोक्यात वरंवटा घालून हत्या, मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
ADVERTISEMENT
