धक्कादायक! पैशासाठी चिमुकल्याला विकलं?; आईसह बाळाला ठेवून घेणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी

मुंबई तक

• 02:58 PM • 22 Jan 2022

– इम्तियाज मुजावर, सातारा एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आई असूनही बाल शिशुगृहात राहण्याची वेळ आली आहे. सातारा येथे ही धक्कादायक घटना घडली असून, सध्या फिर्यादी महिला आणि संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. फिर्यादी महिलेनं हे बाळ 15 की 30 हजार रुपयांना विकलं असल्याचं आतापर्यंतच्या तपासात दिसतं आहे. बाळ बेकायदेशीपणे ताब्यात ठेवणं हा देखील गुन्हा असून […]

Mumbaitak
follow google news

इम्तियाज मुजावर, सातारा

हे वाचलं का?

एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आई असूनही बाल शिशुगृहात राहण्याची वेळ आली आहे. सातारा येथे ही धक्कादायक घटना घडली असून, सध्या फिर्यादी महिला आणि संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. फिर्यादी महिलेनं हे बाळ 15 की 30 हजार रुपयांना विकलं असल्याचं आतापर्यंतच्या तपासात दिसतं आहे. बाळ बेकायदेशीपणे ताब्यात ठेवणं हा देखील गुन्हा असून फिर्यादी व संशयित पोलीस ठाण्यात आहेत. त्यांची चौकशी सुरु असून, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली.

दरम्यान, खासगी सावकारीतून चिमुकल्याला दाम्पत्याने ठेवून घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सावकारीच्या अंगानेही चौकशी केली जाईल, असं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना अपर पोलीस अधीक्षक बोऱ्हाडे यांनी घटनेची माहिती दिली. ‘फिर्यादी पायल कुचेकर या महिलेनं जून 2021 मध्ये हे बाळ बाबर दाम्पत्याला देऊन त्यांच्याकडून 15 वा 30 हजार रुपये घेतले होते, असं त्या महिलेनं म्हटलं आहे. तिने बाळाची विक्री केल्याचं आतापर्यंच्या तपासात दिसत आहे. महिलेनं हे बाळ का दिलं? बाबर दाम्पत्यासोबत त्यांचा नेमका काय व्यवहार ठरला हेही तपासातून समोर येर्इल. मात्र, ज्यांनी हे बाळ ठेवून घेतले त्या बाबर दाम्पत्याचं कृत्यही बेकायदेशीर असून, त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवार्इ करण्यात येत आहे. तसेच फिर्यादी पायल कुचेकर व बाबर दाम्पत्य सातारा शहर पोलीस ठाण्यात असून, त्यांची चौकशी सुरु आहे’, असं बोऱ्हाडे म्हणाले.

पोलिसांनी संबंधित एक वर्षाचं बाळ ताब्यात घेतले आहे. या चिमुकल्याला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून बाल शिशुगृहात ठेवण्यात आलं आहे. बाल कल्याण समितीच्या निर्णयानुसार या प्रकरणात पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी बोऱ्हाडे यांनी दिली.

दरम्यान, हा प्रकार सावकारीतून घडला आहे का? असा प्रश्न बोऱ्हाडे यांना विचारलं असता ‘बाबर हे खासगी सावकारी करतात किंवा नाही. त्याबाबत काही तक्रारी, साक्षीदार, पुरावे मिळाल्यास त्या अनुषंगाने पोलीस चौकशी व तपास करतील. जर खासगी सावकारीचा प्रकार असल्यास त्यानुसार देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जार्इल’, असंही बोऱ्हाडे यांनी सांगितलं.

    follow whatsapp