Monsoon 2022: मुंबईत पावसाच्या सरी, आभाळ दाटलं आणि ट्विटरवर उत्साहाला उधाण

मुंबईत आणि उपनगरांमध्ये चांगलाच उकाडा जाणवतो आहे. प्रचंड उकाड्याने नागरिक त्रासले आहेत. अशात मान्सून दाखल होण्याची सगळेच वाट बघत आहेत. केरळमध्ये मान्सून काही भागात दाखल झाला आहे. मात्र मुंबईत पाऊस अद्याप सुरू होण्यास अवकाश आहे. मात्र काही तुरळक सरी मंगळवारी पहाटे मुंबईत बरसल्या. वांद्रे ते परळ भागात पाऊस झाला त्याचप्रमाणे भांडुप आणि घाटकोपरच्या दरम्यानही पाऊस […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:05 AM • 24 May 2022

follow google news

मुंबईत आणि उपनगरांमध्ये चांगलाच उकाडा जाणवतो आहे. प्रचंड उकाड्याने नागरिक त्रासले आहेत. अशात मान्सून दाखल होण्याची सगळेच वाट बघत आहेत. केरळमध्ये मान्सून काही भागात दाखल झाला आहे. मात्र मुंबईत पाऊस अद्याप सुरू होण्यास अवकाश आहे. मात्र काही तुरळक सरी मंगळवारी पहाटे मुंबईत बरसल्या.

हे वाचलं का?

वांद्रे ते परळ भागात पाऊस झाला त्याचप्रमाणे भांडुप आणि घाटकोपरच्या दरम्यानही पाऊस पडला. मात्र हा मान्सून नसल्याचं हवामान खात्यानेच स्पष्ट केलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, डहाणू, पुणे जिल्ह्याचा काही भाग, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याचनुसार हा पाऊस पडला. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईत काहीसं ढगाळ वातावरण आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. इम्तियाज शेख नावाचा युजर आहे त्याने ट्विटरवर मुंबईतल्या ढगाळ वातावरणाचा आणि पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

काही युजर्सनी ट्विटरवर पावसाचे व्हीडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. दक्षिण मुंबईत कसा पाऊस पडतोय पाहा असं म्हणत एका युजरने व्हीडिओ शेअर केला आहे. तर काहींनी मरिन ड्राईव्ह भागात कसा पहिला पाऊस आला ती दृश्यंही मोबाईल कॅमेरात कैद केली आहेत.

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रापर्यंत चांगली वाटचाल केलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी मात्र दोन्ही समुद्रात कोणतीही प्रगती न करता विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातही पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी झाला असला तर पुढील तीन-चार दिवस कोकण वगळता इतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात अनेक भागात गेली दोन-तीन दिवस पूर्वमोसमी पाऊस झाला. कोकणात मात्र २५ मेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात २५ मेनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अशा सगळ्यात आज बरसलेला पाऊस मुंबईकरांना सुखावून गेला आहे.

    follow whatsapp