मुंबई उपनगरातील मालाडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्याला चोरी करण्यासाठी काहीच सापडलं नाही. संपूर्ण घर शोधूनही त्याला रिकाम्या हाताने परतावं लागणार होतं, मात्र या चोरट्यानं घराबाहेर निघताना एक विचित्र प्रकार केल्याचं समोर आंलं आहे. घरात काहीच न मिळाल्यानं चोरट्यानं बाहेर निघताना घरातील महिलेचं चुंबन घेऊन पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, आरोपीलाही ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Navi Mumbai : सोसायटीच्या मिटींगमध्ये बोलली म्हणून राग, चेअरमन आणि काही लोकांनी थेट महिलेला मारलं
कुरार पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत एका व्यक्तीला अटक केली आहे. मालाडमधील कुरार भागात 3 जानेवारीला ही घटना घडली होती.
38 वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार ती महिला घरी एकटीच होती, तेव्हा आरोपीने घरात घुसून दरवाजा आतून बंद केला. यानंतर आरोपीने महिलेतं कोंड दाबलं आणि तिला सर्व मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड देण्यास सांगितलं. मात्र, महिलेने घरात मौल्यवान वस्तू नसल्याचं सांगताच आरोपीने तिचा चुंबन घेऊन तिथून पळ काढला.
हे ही वाचा >> Asaram Bapu Bail : बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जामीन, तरीही तुरूंगाबाहेर येता येणार नाही?
या महिलेने नंतर कुरार पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनंतर काही वेळातच आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
ADVERTISEMENT
