Navi Mumbai : सोसायटीच्या मिटींगमध्ये बोलली म्हणून राग, चेअरमन आणि काही लोकांनी थेट महिलेला मारलं

मुंबई तक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर कलम 79, 115 (2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 189(2) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या इतर संबंधित तरतुदी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईमध्ये सोसायटीच्या बैठकीत राडा

point

प्रश्न विचारणाऱ्या महिलेेला चेअरमनकडून मारहाण

point

जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुूरू

नवी मुंबईमध्ये एका सोसायटीच्या मिटींगनंतर खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका 44 वर्षीय महिलेला 5 जणांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या घटनेत रबाळे येथील गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष आणि इतर सभासदांनी मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा >> Beed: हवेत गोळीबार करणाऱ्यांचा टप्प्यात कार्यक्रम, सरकारची मोठी कारवाई

पीडितेने मिटींगदरम्यान काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सोसायटीमधील काही लोकांना राग आला. त्यानंतर या लोकांनी थेट महिलेवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. या लोकांनी मारहाण केल्यानंतर महिला जखमी झाली. त्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर कलम 79, 115 (2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 189(2) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या इतर संबंधित तरतुदी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा >> 'धनंजय मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली', सुरेश धसांनी उडवून दिली खळबळ

दरम्यान, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर वाद होतात. यातील एक मुद्दा आहे पार्किंगचा. काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील सुरत शहरात पार्किंगवरून झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका कुटुंबातील लोकांनी दुसऱ्या कुटुंबातील दोन भावांवर हल्ला केला, त्यानंतर एका भावाचा मृत्यू झाला.