'धनंजय मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली', सुरेश धसांनी उडवून दिली खळबळ
धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाली होती. जिथे त्यांनी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: सातपुडा या शासकीय बंगल्यावर धनंजय मुंडेंनीच अवादा कंपनीकडे 3 कोटींची खंडणी मागितली होती. खंडणीची डील 3 कोटींवरून 2 कोटींवर झाली. असा गंभीर आणि खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला आहे. (dhananjay munde demanded a ransom of 3 crores bjp mla suresh dhas created a stir)
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी थेट विधानसभेत आवाज उठवणाऱ्या सुरेश धस यांनी सुरुवातीला वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र आज त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना थेट धनंजय मुंडेंवरच खंडणीचे खळबळजनक आरोप केला आहेत. पाहा सुरेश धस नेमकं काय म्हणाले
'धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, 3 कोटींची खंडणी मागितलेली..', धसांचा गंभीर आरोप
'सातपुडा या शासकीय बंगल्यावर बैठक झाली. इथे अफताब तांबोळी, शर्मा, नितीन बिक्कड, वाल्मिक आण्णा आणि धनंजय मुंडे हे होते. धनंजय मुंडे होते त्यांनी 3 सांगितले.'
हे ही वाचा>> Ajit Pawar: 'तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात...' अजितदादा 'हे' काय बोलून गेले?
'सातपुड्याला काय ते संत तुकारामांच्या ग्रंथाचं विमोचन करायला आले होते का? की ज्ञानेश्वरीचं प्रकाशन होतं का? धनंजय मुंडे तिथे होते त्यांनी 3 सांगितले.. कर्मचारी बाहेर गेला त्याने फोन केला.. समोरून सांगितलं 3 कोटी नाही देणार.. त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना आणि हे सीडीआरमध्ये येईल ना.'










