बापरे! मुंबईत दिवसभरात ९ हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद

मुंबई तक

• 02:16 PM • 03 Apr 2021

मुंबईत दिवसभरात ९ हजार ९० नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. दिवसभरात ५ हजार ३२२ लोक कोरोना मुक्त झाले आहेत. तर २७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आज घडीला मुंबईत ६२ हजार १८७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३ लाख ६६ हजार ३६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत दिवसभरात ९ हजार ९० नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. दिवसभरात ५ हजार ३२२ लोक कोरोना मुक्त झाले आहेत. तर २७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आज घडीला मुंबईत ६२ हजार १८७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३ लाख ६६ हजार ३६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत एकूण ११ हजार ७५१ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

मुंबईचा डबलिंग रेट अर्थात रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण हे ४८ वरून ४४ दिवसांवर आलं आहे २७ मार्च ते २ एप्रिल या कालावधी रूग्ण वाढीचा दर हा १.५४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८३ टक्के झाला आहे. अशीही माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई लोकल बंद होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात कोरोना रूग्ण वाढत आहेत. राज्यातही कोरोना रूग्ण वाढत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. यामध्येही त्यांनी वाढत चाललेले रूग्ण आणि अपुरी पडत असलेली आरोग्य व्यवस्था यावर भाष्य केलं. सगळ्यांनी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन पुन्हा लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

३० मार्चला आयुक्त इकबाल सिंह चहल काय म्हणाले होते?

मुंबईत गेल्या काही आठवड्याभरात झपाट्याने कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी मुंबईत बेड उपलब्ध नसल्याची भीती अनेकांना वाटत आहे. मात्र, आयुक्तांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘कोरोनाची दुसरी लाट ही 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली. आतापर्यंत त्याला 48 दिवस झाले आहेत. या 48 दिवसात साधारण 85 हजार रुग्ण हे मुंबईत सापडले आहेत. ज्यापैकी 65 हजारांहून अधिक रुग्ण हे लक्षणं नसलेले आहेत.

    follow whatsapp