मुंबई : तीन वर्षांच्या चिमुकल्यासह पित्याची रेल्वेसमोर उडी; नालासोपारा स्थानकातील घटना

मुंबई तक

• 12:45 PM • 07 Mar 2022

नालासोपारा येथे एक काळीज पिळवटून टाकणारी घटना रविवारी घडली. एका पित्याने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यांसह भरधाव रेल्वेसमोर उडी घेतली. घटनेत तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहे. रेल्वे पोलिसांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. घटनेतील व्यक्तीची ओळख पटली असून, तो वसईतील रहिवाशी आहे. ३० वर्षीय राजू वाघेला हे रविवारी आपल्या तीन […]

Mumbaitak
follow google news

नालासोपारा येथे एक काळीज पिळवटून टाकणारी घटना रविवारी घडली. एका पित्याने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यांसह भरधाव रेल्वेसमोर उडी घेतली. घटनेत तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहे.

हे वाचलं का?

रेल्वे पोलिसांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. घटनेतील व्यक्तीची ओळख पटली असून, तो वसईतील रहिवाशी आहे. ३० वर्षीय राजू वाघेला हे रविवारी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह नालासोपारा येथील स्थानकात आले.

घरगुती वादातून पत्नीची कोयत्याने गळा चिरुन हत्या, आरोपी पती फरार

बापलेकांनी थोडा वेळ लोकल रेल्वेची प्रतिक्षा केली. थोड्यावेळाने लोकल आल्यानंतर वाघेला यांनी आपल्या तीन वर्षाच्या मुलासह चर्चेगेटकडे जाणाऱ्या लोकलसमोर उडी मारली.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार लोकलच्या धडकेमुळे वाघेला दूर फेकले गेले. ते यात जखमी झाले, तर त्यांचा तीन वर्षांचा मुलगा जागीच मरण पावला. दुर्घटनेनंतर लोकल चालकाने याची माहिती पोलिसांना दिली.

बेरोजगारीमुळे आत्महत्या?

या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात राजू वाघेला हा बेरोजगार असून, गेल्या वर्षभरापासून पत्नीपासून वेगळं राहत होतं. बेरोजगारी आणि मुलाचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरत असल्याने राजू वाघेला यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बाईकवरुन जाणाऱ्या जोडप्याला थांबवत आरोपींकडून पतीला मारहाण, पत्नीवर बलात्कार

राजू वाघेला यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलेलं असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. वाघेला यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ते शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, मुलाच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    follow whatsapp