राहुल गांधींना त्यांच्या पक्षात काम करू दिलं जात नाही असं माझं आकलन-संजय राऊत

मुंबई तक

• 11:42 AM • 10 Dec 2021

काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांना काम करू दिलं जात नाही आणि जुने जाणते त्यांची जागा सोडत नाही असं माझं आकलन आहे असं वक्तव्य आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलं आहे. संजय राऊत म्हणाले की राहुल गांधी यांनी मला सांगितलं पंजाबमध्ये मी अमरिंदर सिंग यांच्यावर कारवाई करायची होती. ती मला […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांना काम करू दिलं जात नाही आणि जुने जाणते त्यांची जागा सोडत नाही असं माझं आकलन आहे असं वक्तव्य आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलं आहे. संजय राऊत म्हणाले की राहुल गांधी यांनी मला सांगितलं पंजाबमध्ये मी अमरिंदर सिंग यांच्यावर कारवाई करायची होती. ती मला जुने-जाणते लोक करू देत नव्हते. मी धाडसाने ती कारवाई केली ज्याचा पक्षाला फायदा होतो आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

संजय राऊत म्हणतात देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त, राज्य गेल्याने अस्वस्थ

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

युपीए संपलंय असं नाही म्हणता येणार. काही ठिकाणी डावे आहेत, डीएमके युपीएत आहेत. इंदिरा गांधींच्या काळात काय घडलं होतं यावरही आम्ही चर्चा केली. राहुल गांधी हे आपल्या पद्धतीने काम करत आहेत. राहुल गांधी हे काहीसे भिडस्त स्वभावाचे आहेत. चार टप्प्यातून निर्णय होता होता वेळ निघून जाते. तसा त्यांचा स्वभाव नाही. पक्ष दुबळा होतो तेव्हा कुणी ऐकत नाही. नरसिंहराव यांचं एक खूप चांगलं वक्तव्य होतं. एका मॅजिस्ट्रेट कोर्टाने नरसिंहराव पंतप्रधान पदावरून पायऊतार झाले होते. हत्तीवर कुत्राही भुंकू शकतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. जुने जाणते लोक आपलं स्थान सोडायला तयार नाहीत, राहुल गांधींना काम करू देत नाही असं माझं आकलन आहे.

भाजपसोबतही आम्ही सत्तेत होतो. पण सरकार कसं चालत होतं ते आम्ही पाहिलं. रोज भांड्याला भांडं लागायचं, भांडं फुटायचं, गळायचं. आता तशी परिस्थिती नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून सरकारमधे आम्ही आहोत. आमचं चांगलं चाललं आहे. समजा कुणी स्वबळाची भाषा केली तर ठीक आहे. आम्ही पक्ष विलीन केलेले नाहीत. किमान समान कार्यक्रमावर सरकार चाललं आहे. त्यावर आम्ही उत्तम काम चाललं आहे. पक्ष विस्तार आम्हीपण करतो आहे. सगळेजण करत आहेत त्यात गैर काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

शिवसेना युपीएचा भाग होणार आहे का? असा प्रश्न विचारला असता आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत युपीएसोबत बळकटीकरण कसं होईल याची चर्चा केली. आम्ही युपीएत नाही पण आम्ही त्यावर चर्चा केली. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. ममता बॅनर्जी यांनी दिलेला लढा हा एक उत्तम उदाहरण आहे. पण काँग्रेसचा आणि त्यांचा जुना संघर्ष आहे. शिवसेना युपीएमध्ये का नाही? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की राहुल गांधींना मी सांगितलं तर तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही पुढाकार घेऊन अनेक पक्ष युपीए किंवा विरोधी पक्षांमध्ये सहभागी होऊ शकतात. तरच आघाडी उभी राहिल. विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी मी राहुल गांधींना भेटलो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp