Nagpur MLC : सतीश इटकेलवारांवर वायुवेगाने कारवाई

मुंबई तक

16 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:16 AM)

Nagpur MLC Election update नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सतीश इटकेलवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आदेश देऊनही अर्ज कायम ठेवल्याने त्यांच्यावर पक्षाकडून तात्काळ कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनाचा राष्ट्रवादीचाही पाठिंबा राहिलं असं जाहीर […]

Mumbaitak
follow google news

Nagpur MLC Election update

हे वाचलं का?

नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सतीश इटकेलवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आदेश देऊनही अर्ज कायम ठेवल्याने त्यांच्यावर पक्षाकडून तात्काळ कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनाचा राष्ट्रवादीचाही पाठिंबा राहिलं असं जाहीर करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी याबाबत माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश इटकेलवार यांना अर्ज मागे घेण्यासाठी आदेश दिले. इतर वरिष्ठांनीही आदेश दिले, आमदार अनिल देशमुख, शहर अध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना सुचित केले पण त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे इटकेलवार यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात आली असं पेठे यांनी सांगितलं.

याशिवाय शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पेठे यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर, नागपूर ग्रामीण हे अडबाले यांच्या सोबत उभे राहतील असंही त्यांनी सांगितलं.

अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर शिक्षक मतदारसंघातून पाच उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. यात नीलकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके, गंगाधर नाकाडे आणि मृत्युंजय सिंग यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि सतीश इटकेलवार यांनी त्यांचे अर्ज कायम ठेवले. याचनंतर सतीश इटकेलवर यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

दरम्यान, शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे म्हणाले, काँग्रेस आणि महाविकास आघाडीने समर्थन दिले नाही तरी मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. मागील निवडणुकीत मला ८ हजार मतं मिळाली होती. काँग्रेसने पदवीधर विधान परिषद निवडणुकीवेळी शिक्षक भारतीला शब्द दिला होता, पण आता काँग्रेस त्यांच्या शब्दावरून मागे हटली आहे असं दिसतं.

    follow whatsapp