दिशा सालियन प्रकरणात राणे पिता-पुत्रांना दिलासा, १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

दिशा सालियन प्रकरणात केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या राणे पिता-पुत्रांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. १० मार्चपर्यंत राणे पिता-पुत्रांना हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. नारायण राणेंनी दिशा सालियनबद्दल केलेल्या वक्तव्याची दखल महिला आयोगाने घेऊन मुंबई पोलिसांना चौकशी करुन गुन्हा दाखल करायचे आदेश दिले होते. ज्यानंतर मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे आणि नितेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल […]

Mumbai Tak

विद्या

• 10:10 AM • 04 Mar 2022

follow google news

दिशा सालियन प्रकरणात केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या राणे पिता-पुत्रांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. १० मार्चपर्यंत राणे पिता-पुत्रांना हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. नारायण राणेंनी दिशा सालियनबद्दल केलेल्या वक्तव्याची दखल महिला आयोगाने घेऊन मुंबई पोलिसांना चौकशी करुन गुन्हा दाखल करायचे आदेश दिले होते. ज्यानंतर मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे आणि नितेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का?

नारायण राणेंच्या वतीने ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे यांनी कोर्टासमोर अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांविरुद्ध IPC च्या २११, ५००, ५०४, ५०९, ५०६ आणि ३४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूबद्दल संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य करुन मृत्यूपश्चात तिची बदनामी केल्याप्रकरणी दिशा सालियनच्या पालकांनी शिवसेना नेत्यांच्या मदतीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

दिशा सालियन ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरात सापडल्याच्या सहा दिवस आधी ८ जुन २०२० मध्ये दिशाने आत्महत्या केली होती. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिशाच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करताना अनेक विधानं केली होती. ही विधान आपल्या मुलीची प्रतीमा मलिन करणारी असल्याची तक्रार दिशाच्या पालकांनी केली होती.

नारायण राणेंचा हल्लाबोल सुरुच, दिशा सालियन प्रकरणात केलं आणखी एक विधान

आज झालेल्या सुनावणीदरम्यान मानेशिंदे यांनी, राणे यांच्यावर वचक ठेवण्यासाठी ही FIR दाखल झाल्याचं कोर्टासमोर सांगितलं. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला. ज्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी १० मार्चपर्यंत तहकुब करुन राणे पिता-पुत्रांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

    follow whatsapp