Nashik Truck Accident : देवदर्शनाहून परतणाऱ्या पिक-अपला ट्रकची धडक, नाशिकमध्ये 5 जण जागीच ठार, जखमींमध्ये...

मुंबई तक

13 Jan 2025 (अपडेटेड: 13 Jan 2025, 10:04 AM)

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला आहे. एका पिक-अप आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नाशिकमध्ये ट्रक आणि पिक-अपचा भीषण अपघात

point

अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला आहे. एका पिक-अप आणि आयशर ट्रकची धडक झाल्यानं हा अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिक-अपची लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या टेम्पोशी धडक झाल्यानं झालेल्या या अपघातात अजूनही काही जण जखमी आहेत.

हे वाचलं का?

अपघातातील सर्व नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी आहेत. निफाडमधील धार्मिक स्थळावरून परतत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. अपघातातील जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> Dhananjay Deshmukh : 'वाल्मिक कराडला मकोका आणि खुनाच्या गुन्ह्यात...'; धनंजय देशमुख टॉवरवर चढून करणार आंदोलन

नाशिकचे सिव्हिल सर्जन यांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी पाच जण मृत असल्याचं कळलं. तर 5 जखमींवर उपचार सुरू आहेत. 2 जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सिव्हिल सर्जन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, अतुल मंडलिक,संतोष मंडलिक, दर्शन घरत, यश घरत आणि चेतन पवार यांचा मृत्यू झालाय.तर राहुल राठोड, लोकेश निकम, अरमान खान आणि इतर तिघे जखमी झाले आहेत.
 

हे ही वाचा >> Amit Shah : "शरद पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम...", अमित शाहांचं विरोधकांवर शरसंधान

या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर येथील रहिवासी आहेत. ते पिक-अपमधून देवदर्शनासाठी गेले होते. नाशिकला परतत असताना, द्वारका चौकातील उड्डाणपुलावरून खाली उतरताना पिकअपच्या लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक झाली.