मविआ सरकार गेलं! जितेंद्र आव्हाड ते सुप्रिया सुळे… या नेत्यांवर राष्ट्रवादीनं टाकल्या नव्या जबाबदाऱ्या

मुंबई तक

• 03:03 PM • 16 Sep 2022

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. राज्यात सत्तांतर झालं. शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून सत्तेत आलेलं सरकार पायउतार झालं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा पक्षविस्तारावर आणि पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं असून, राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने कार्यकारिणीची निवड केली आहे. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून ते सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. यात जितेंद्र आव्हाड यांच्यावरही महत्त्वाची […]

Mumbaitak
follow google news

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. राज्यात सत्तांतर झालं. शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून सत्तेत आलेलं सरकार पायउतार झालं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा पक्षविस्तारावर आणि पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं असून, राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने कार्यकारिणीची निवड केली आहे. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून ते सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. यात जितेंद्र आव्हाड यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपण्यात आलीये.

हे वाचलं का?

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याच्या विविध भागांचा दौरा करताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून, त्यात राज्यातील नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी शुक्रवारी (१६ सप्टेंबर) जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार, तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बारामतीपासून घड्याळ बंद करण्याचा भाजपचा कार्यक्रम; बावनकुळेंचा पवारांना इशारा

महाराष्ट्रातून जनरल सेक्रेटरी पदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आयत्या बिळावर नागोबा – खासदार प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल

खासदार सुनिल तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी, तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मीडिया आणि आयटी व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    follow whatsapp