अंबाबाईची माहेश्वरी रुपात अलंकार पूजा

नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ची माहेश्वरी रूपातली अलंकार पूजा साकारण्यात आली आहे. माहेश्वरी अर्थात शुंभनिशुंभ वधाच्या प्रसंगी रक्तबीज दैत्याचा संहार करण्यासाठी प्रत्येक देवाची मूर्तीमंत शक्ती प्रगट झाली त्या शक्तींना मातृका म्हणून ओळखले जाते. या मातृका मंडलापैकी भगवान शंकरांची अर्थात महेश्वर यांची शक्ती म्हणजे माहेश्वरी. भगवान शंकरांची मूर्तिमंत शक्ती […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:54 PM • 08 Oct 2021

follow google news

हे वाचलं का?

नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ची माहेश्वरी रूपातली अलंकार पूजा साकारण्यात आली आहे.

माहेश्वरी अर्थात शुंभनिशुंभ वधाच्या प्रसंगी रक्तबीज दैत्याचा संहार करण्यासाठी प्रत्येक देवाची मूर्तीमंत शक्ती प्रगट झाली त्या शक्तींना मातृका म्हणून ओळखले जाते.

या मातृका मंडलापैकी भगवान शंकरांची अर्थात महेश्वर यांची शक्ती म्हणजे माहेश्वरी.

भगवान शंकरांची मूर्तिमंत शक्ती म्हणजे भगवती माहेश्वरी

हातामध्ये भगवान शंकरा प्रमाणेच त्रिशूल अक्षमाला अशी आयुधे, नंदी वाहन, माथ्यावरती चंद्रकोर जटामुकूट, कपाळावर त्रिनेत्र‌ अशी भगवती माहेश्वरी भक्तजनांच्या समस्त इच्छा पूर्ण करते

हि भगवती माहेश्वरी शक्ती आपणा सगळ्यांच्या दुर्गुणांचा क्षय करून आपल्याला सर्व दृष्टीने अधिकाधिक पात्र बनवू दे हीच जगदंबा चरणी प्रार्थना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी नियमाचं पालन करुन भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp