भाजपचे नेते प्रभू रामचंद्रांच्या नावे असलेली जागा हडपत आहेत, नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

मुंबई तक

• 07:34 AM • 21 Dec 2021

भाजप राजकारण करताना प्रभू रामचंद्रांचं नाव घेतं. मात्र याच पक्षाचे नेते प्रभू रामचंद्रांच्या नावे असलेली जागा हडप करत आहेत असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. तसंच या प्रकरणात आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केला. या आरोपांनी खळबळ उडाली आहे आता भाजपकडून या आरोपांना काय उत्तर दिलं जाणार […]

Mumbaitak
follow google news

भाजप राजकारण करताना प्रभू रामचंद्रांचं नाव घेतं. मात्र याच पक्षाचे नेते प्रभू रामचंद्रांच्या नावे असलेली जागा हडप करत आहेत असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. तसंच या प्रकरणात आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केला. या आरोपांनी खळबळ उडाली आहे आता भाजपकडून या आरोपांना काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे वाचलं का?

लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं… नवाब मलिक यांचा टोला

नेमकं काय म्हणाले नवाब मलिक?

‘जो भारतीय जनता पक्ष रामाच्या नावाने राजकारण करतो, त्या पक्षाचे नेते प्रभू रामचंद्रांच्या देवस्थानची जागा हडप करत आहेत. विठोबाच्या नावे असलेली देवस्थानची जागा हडपत आहेत. सात मंदिरांच्या माध्यमातून जागा हडप करून हजारो कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. ईडीसारखी संस्था ज्यावर कुणीही अविश्वास दाखवत नाही. ती संस्था या दहा देवस्थानांच्या जमिनीच्या हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. ईडीने आता या प्रकरणी चौकशी करावी अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात जी मुस्लिम किंवा इतर धर्माच्या नावाने देवस्थान असेल ती जागा हडपण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे ती थांबावी म्हणून आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे.’

‘वक्फच्या विरोधात तक्रारी होत आहेत. मात्र या सात मंदिरांच्या नावे असलेल्या आणि हडप केलेल्या जमिनींचं काय? हा प्रश्न कायम आहे असंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं. कुणाचाही हयगय या प्रकरणी केली जाणार नाही. २०१७ पासून मंदिर घोटाळा सुरू झाला. विठोबा, प्रभू राम अशा मंदिरातील 300 एकरच्या जमिनी बळकावण्यात आल्या आहेत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.’

‘आष्टीमधल्या मुस्लीम देवस्थानाच्या तीन जागा आणि हिंदू देवस्थानाच्या सात जागा बेकायदेशीरपणे खालसा करून लाटण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदू देवस्थानच्या 300 एकर जमिनीचा समावेश असून मुस्लीम दर्गा आणि मशिदीच्या 213 एकर जमिनीचा समावेश आहे. देवस्थानांच्या जमिनीचा मालकी कधीही बदलता येत नाही. पण एकूण 513 एकर जमिनीचा हा घोटाळा झाला आहे.’ असा दावा नवाब मलिक यांनी केला.

दोन नेत्यांची नावं ईडीच्या तक्रारीत आहेत. एक भाजपचे सध्याचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावावर तक्रार झाली आहे. जो भाजप रामाच्या नावाने राजकारण करतो, त्याच भाजपाचे नेते प्रभू रामाच्या देवस्थानाची जागा हडप करत आहेत. विठोबाच्या नावाच्या देवस्थानाची जागा हडपत आहेत. सात मंदिरांच्या ट्रस्टच्या जागा हडप करून हजारो कोटी लाटण्याचा धंदा भाजपकडून झाला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ईडीसारखी संस्था जिच्यावर कुणीही अविश्वास दाखवत नाही, या प्रकाराचा तपास करेल. तीन मुस्लीम आणि सात हिंदू देवस्थानांच्या या जमिनींचा हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे

    follow whatsapp