धनंजय मुंडे कारचा भीषण अपघात, छातीला लागला मार; मध्यरात्री काय घडलं?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या भीषण कार अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. मतदारसंघात गाठीभेटी घेऊन घरी परतत असतानाच परळी शहरात बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. स्वतः धनंजय मुंडे यांनीच अपघात कसा झाला, अपघाताचं कारण काय याबद्दल माहिती दिलीये. धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 06:42 AM • 04 Jan 2023

follow google news

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या भीषण कार अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. मतदारसंघात गाठीभेटी घेऊन घरी परतत असतानाच परळी शहरात बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. स्वतः धनंजय मुंडे यांनीच अपघात कसा झाला, अपघाताचं कारण काय याबद्दल माहिती दिलीये.

हे वाचलं का?

धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केलीये. धनंजय मुंडे म्हणाले, “मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.”

दीपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी -संजय राऊत

या अपघातानंतर धनंजय मुंडे यांच्या कारचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये कारच्या पुढच्या काही भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचं दिसत आहे. त्यावरुन हा अपघात अगदीच किरकोळ होता असं म्हणता येणार नाही.

Ahmadnagar : “बाहेरच्या लोकांनी येऊन…”; विखे पाटलांनी पडळकरांना फटकारलं

सध्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, धनंजय मुंडे यांना दुपारी दोनच्या दरम्यान ॲम्बुलन्सद्वारे लातूरहून मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.

Sudhir मुनगंटीवार दिल्लीत जाणार?, भाजपमध्ये नव्या राजकारणाची सुरुवात

हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांना रात्रीच्या वेळी प्रवास टाळण्याचं आवाहन केलं होतं. भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताचाही पवारांनी दाखला दिला होता. तसंच आपण सांगितल्यानंतर धनंजय मुंडेंनी रात्रीचा प्रवास थांबवल्याचंही सांगितलं होतं. गेल्यावर्षी रात्रीच्या वेळी प्रवास करतानाच विनायक मेटे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

    follow whatsapp