‘फक्त आरोप झाले तरी नाथाभाऊंनी राजीनामा दिला’; मंत्रिमंडळ विस्तारावर एकनाथ खडसे काय म्हणाले?

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी देखील 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिली. उशिरा का होईना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा मी स्वागत करतो आणि राज्यात विकास कामासंदर्भात पाऊले उचलावी, एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ खडसेंनी नेमकं काय म्हटलं आहे? विकास कामांना […]

Mumbai Tak

मुंबई तक

09 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

follow google news

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी देखील 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिली. उशिरा का होईना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा मी स्वागत करतो आणि राज्यात विकास कामासंदर्भात पाऊले उचलावी, एकनाथ खडसे म्हणाले.

हे वाचलं का?

एकनाथ खडसेंनी नेमकं काय म्हटलं आहे?

विकास कामांना जी स्थगिती देण्यात आली आहे ती स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवून विकास कामांना गती देण्याचं काम करावं, असा सल्ला खडसेंनी दिला आहे. कोट्यवधी रुपयांचे कामं प्रलंबित आहेत, अजूनही अनेक शेतकऱ्यांना मदत बाकी आहे, विविध क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकारने वेगाने काम करावं, अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

आरोप असलेल्या आमदारांना मंत्रिपद दिल्यावरून एकनाथ खडसेंचा टोला

महाविकास आघाडी सरकार असताना भाजपने शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केले होते. त्यापैकी संजय राठोड यांच्यावर देखील पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, शिंदे गटाकडून मंगळवारी त्यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून एकनाथ खडसे यांनी शिंदे आणि फडणवीस यांना टोला लगावला. पूर्वी नुसता आरोप झाला तर नाथ भाऊला राजीनामा द्यावा लागला होता. आता आरोप नाही समोर पुरावे दिली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट त्यांना मंत्रीमंडळमध्ये स्थान दिला जातो, अशी परिस्थिती असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.

जळगाव जिल्ह्यात दोन मंत्रीपद

मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटातील 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या 18 पैकी दोन मंत्रिपद हे जळगाव जिल्ह्याला मिळाले आहे. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील तर भाजपकडून गिरीश महाजन यांनी शपथ घेतली आहे. दोन्ही नेते जळगाव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. यावर बोलताना खडसे म्हणाले, आता जिल्ह्याला डबल इंजिन मिळालं तर दुप्पट वेगाने कामं व्हावे. पालकमंत्री मी व्हायला पाहिजे, कोण श्रेष्ट? अशा भानगडीत या जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये, असं खडसे म्हणाले. दोघांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. चांगलं काम करत असाल तर आमचा पाठिंबा राहील, असा विश्वास देखील खडसेंनी बोलून दाखवला.

    follow whatsapp