गुजरात: आज देशभरात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होत आहे. २१ तारखेला याचा निकाल लागून देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी गटाने उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात लढाई आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याची बातमी आली आहे. गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधल एस जडेजा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचा दावा केला आहे.
ADVERTISEMENT
तिकडे ओडिशामध्ये देखील क्रॉस व्होटिंग झाले आहे. काँग्रेस आमदार मोहम्मद मुकीम यांनी सांगितले की त्यांनी एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांना मतदान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुकीम यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष न केल्याने पक्षावर नाराजी असल्याचे बोलले जात आहे.रा
राष्ट्रपतीपदाची निवडणूक, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रवादीकडून क्रॉस व्होटिंग
आसाममध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा एआययूडीएफचे आमदार करीमुद्दीन बारभुईया यांनी केला आहे. करिमुद्दीन यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने रविवारी सर्वांना एकत्र बोलावले होते त्यावेळी फक्त 2-3 आमदार पोहोचले होते. बैठकीला फक्त जिल्हाध्यक्ष पोहोचले होते. यावरून काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर काँग्रेसच्या २० हून अधिक आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले निकाल समोर आल्यानंतर तुम्हाला समजेल कोणी क्रॉस व्होट केले.
दरम्यान महाराष्ट्रात देखील आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मतदान केले आहे. एकनाथ शिंदेंनी २०० आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील अशी भविष्यवाणी केली होती. द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील आल्या होत्या. राज्यात राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला होता. आता राष्ट्रपती निवडणुकीतही क्रॉस व्होटिंग होणार का? हे पाहावे लागणार आहे.
ADVERTISEMENT
