फुरसुंगी-उरुळी पुणे महापालिकेतून बाहेर, राज्य सरकारने घेतला स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची स्वतंत्र नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल,’ असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णयानंतर मांडलं. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:55 AM • 07 Dec 2022

follow google news

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची स्वतंत्र नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

हे वाचलं का?

‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल,’ असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णयानंतर मांडलं.

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली.

MNS: वसंत मोरेंबद्दल मनसे घेणार मोठा निर्णय?, पुणे मनसेत नवं राजकारण

या बैठकीला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे महापालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे’, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केलं.

नागपूर-पुणे प्रवास आता होणार आठ तासांत! नितीन गडकरींची घोषणा, नवा मार्ग ‘समृद्धी’ला जोडणार

सरकारने नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपस्थित फुरसुंगी आणि ऊरळी देवाची येथील नागरिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. तसेच पुणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य दिले जाईल, असे सांगितले.

PMC: मुंबईला मागे टाकून पुण्याने मारली बाजी, पुणे आता राज्यातील सर्वात मोठी महापालिका!

पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसूंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे.

    follow whatsapp