मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू

मुंबई तक

• 04:03 PM • 18 Feb 2021

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्या आणि प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. काय आहेत नवे निर्बंध ? पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळणाऱ्या इमारती सील केल्या जाणार होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार विना मास्क रेल्वे प्रवास करणाऱ्यांवर […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्या आणि प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

काय आहेत नवे निर्बंध ?

पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळणाऱ्या इमारती सील केल्या जाणार

होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार

विना मास्क रेल्वे प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 300 मार्शल्सची नियुक्ती

दररोज 25 हजार जणांवर कारवाईचं लक्ष्य

मंगल कार्यालयं, क्लब, उपहारगृहं या ठिकाणी धाडी टाकण्यात येणार

ब्राझिलमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवणार

रूग्ण वाढत असलेल्या विभागांमध्ये तपासण्यांची संख्या वाढवणार

इक्बाल सिंह चहल यांनी काय म्हटलं आहे?

“कोविड 19 अर्थात कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाच्या नवीन विषाणूने जगातील काही देशांमध्ये हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले असतानाच मागील काही दिवसांमध्ये रूग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.”

“जून-जुलै 2020 मधील कोरोना स्थितीच्या तुलनेत आजही कोविडची परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही कोरोना रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेने दक्ष राहणं आवश्यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी आणि कोरोना प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन करणंही आवश्यक आहे” असंही चहल यांनी म्हटलं आहे.

लक्षणे नसलेल्या बाधित रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येतं. अशा रुग्णांच्या हातावर शिक्के मारण्यात यावेत आणि त्यांची माहिती संबंधित सोसायटीला कळवली जावी

लग्न समारंभाची मंगल कार्यालयं, जिमखाना, क्लब्स, नाईट क्लब्स, रेस्तराँ, चित्रपटगृहं, खेळाची मैदानं, उद्यान, शॉपिंग मॉल,सर्व खासगी कार्यालयं या ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक

मास्कचा योग्यरित्या वापर न करणाऱ्य तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी सध्या कार्यरत असलेल्या 2400 मार्शल्सची संख्या दुपटीने वाढवून 4800 करण्यात येणार

मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर उपनगरीय रेल्वे सेवांच्या लोकल ट्रेन्समध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी 300 मार्शल्स नेमले जाणार

असेही काही नियम लागू करण्यात आले आहेत.

    follow whatsapp