Nirav Modi ची प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी नवी नाटकं! मानसिक रोग, आत्महत्या, कोरोना ही दिली कारणं

कर्जबुडव्या नीरव मोदीने भारतातलं प्रत्यार्पण टाळण्यासाठी आता कोरोना, मानसिक आजार आणि आत्महत्या ही कारणं दिली आहेत. नीरव मोदीच्या वकिलांनी लंडन हायकोर्टात जो युक्तिवाद केला त्यामध्ये त्यांनी ही सगळी कारणं दिली आहेत. मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमध्ये जर नीरव मोदीला ठेवण्यात आलं तर तो आत्महत्या करू शकतो अशी शक्यता आहे. एवढंच नाही तर त्याला ही भीती वाटते […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:47 AM • 09 Aug 2021

follow google news

कर्जबुडव्या नीरव मोदीने भारतातलं प्रत्यार्पण टाळण्यासाठी आता कोरोना, मानसिक आजार आणि आत्महत्या ही कारणं दिली आहेत. नीरव मोदीच्या वकिलांनी लंडन हायकोर्टात जो युक्तिवाद केला त्यामध्ये त्यांनी ही सगळी कारणं दिली आहेत. मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमध्ये जर नीरव मोदीला ठेवण्यात आलं तर तो आत्महत्या करू शकतो अशी शक्यता आहे. एवढंच नाही तर त्याला ही भीती वाटते आहे की आपल्याला कोरोना होईल. भारतात प्रत्यार्पण झालं तर नीरव मोदीला ऑर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नीरव मोदीने आता नवी नाटकं सुरू केली आहेत. या सुनावणीत नीरव मोदी व्हर्चुअल माध्यमातून सहभागी झाला होता.

हे वाचलं का?

या सगळ्या युक्तिवादानंतर जस्टिस मार्टिन चेंबरलेन या प्रत्यार्पणाच्या याचिकेवरचा निर्णय राखीव ठेवला आहे. यानंतर होणाऱ्या सुनावणीत कोर्ट निर्णय घेणार आहे. डिस्ट्रिक्ट जज सॅम गूज यांनी दिलेल्या प्रत्यार्पणाच्या निर्णयावर आणि ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी दिलेल्या मंजुरीविरोधात हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातली पूर्ण सुनावणी होणार नाही.

इंडियन अथॉरिटीजनी क्राऊन प्रॉसक्युशन सर्व्हिस च्या वकी हेलन मॅलकम यांनी या अपीलाला विरोध दर्शवला आहे. नीरव मोदीची मानसिक स्थिती अगदी व्यवस्थित आहे. त्याला मानसिक संतुलन ढळायला काहीही झालेलं नाही. एवढंच नाही तर भारत सरकारने हे आश्वासन दिलं आहे जेव्हा नीरव मोदीचं प्रत्यार्पण केलं जाईल तेव्हा त्याची आरोग्य व्यवस्था व्यवस्थित असणार आहे. राजनैतिक स्तरावर देण्यात आलेल्या या आश्वसनाचं कधीही उल्लंघन होत नाही. ब्रिटनच्या गृहमंत्र्यांच्या वकिलांनीही असाच युक्तीवाद केला.

नीरव मोदीला मानसिक आजार

जज मार्टिन चेंबरलेन यांच्यासमोर झालेल्या नव्या याचिकेच्या सुनावणीत नीरव मोदीच्या वकिलांनी आता हे म्हटलं आहे की नीरव मोदीची मानसिक अवस्था बरी नाही. त्यामुळे अशा अवस्थेत त्याचं प्रत्यार्पण करण्याची संमती देऊ नये. जर नीरवचं मानसिक संतुलन चांगलं नसेल तर तो आत्महत्याही करू शकतो. तसंच भारतातील मुंबईमध्ये असलेल्या ऑर्थर रोड जेलमध्ये त्याला ठेवण्यात येणार आहे तिथे त्याला कोरोनाही होऊ शकतो.

    follow whatsapp