काही होतच नाही, तर…; कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं कोरोना लसीबद्दल वादग्रस्त विधान

कोरोनाच्या संसर्गाला पायबंद घालून संभावित तिसरी लाट टाळण्यासाठी सरकारकडून नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून नागरिकांना लसीकरणाचं महत्त्व पटवून देत लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असताना प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:55 AM • 03 Nov 2021

follow google news

कोरोनाच्या संसर्गाला पायबंद घालून संभावित तिसरी लाट टाळण्यासाठी सरकारकडून नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून नागरिकांना लसीकरणाचं महत्त्व पटवून देत लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असताना प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

हे वाचलं का?

नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी कोरोना लसीबद्दल विधान केलं. लोकनेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१ व्या जयंती निमित्ताने घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी शेतकरी मेळावा आणि इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हे विधान केलं.

काय म्हणाले इंदोरीकर महाराज?

“कोरोना झालेल्या त्यांच्या कुटुंबियांनी सर्वाधिक त्रास दिला. कोरोना रुग्ण खुर्चीवर बसत असेल, तर बसू द्यायचं नाही. त्याच्या गोधड्या पेटवून दिल्या. 75 टक्के लोकं कोरोना मेली नाही, तर टेन्शनमुळे गेली आणि घरच्यांनी घालवली. त्याच्या ताटात जेवायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगळी असते, हे तरी कळायला पाहिजे ना. ज्ञान आणि प्रतिकारक शक्ती प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते.”

“डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्यांनीही रुग्णांच्या हातात गोळ्या दिल्या नाहीत. फेकल्या. फक्त पैसे गोळा केले. त्याला गोळी फोडून देण्याची आणि गोळी घेतल्यानंतर दुपारपर्यंत बरं वाटेल असं सांगण्याची गरज होती. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता आणि प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगळी असते.”

Indorikar Maharaj यांच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आता सरकारी पक्षाकडून हायकोर्टात याचिका

“आम्ही दिवसभर फिरतो. काय होईल? मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही, तर घेऊन करायचं काय? कोरोनाला एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. त्याच्या गादीवर झोपायचं नाही, हा काय बावळटपणा आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला, तर सीता घेऊन गेला. इथे राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं डोकावून पण पाहिलं नाही”, असं इंदोरीकर महाराज कीर्तन करताना म्हणाले.

    follow whatsapp