पुणे: एकतर्फी प्रेम, पण दुसऱ्या तरुणासोबत लग्न झाल्याने थेट पतीचा गेम! सासवडमधील धक्कादायक घटना!

पुण्यातील सासवड येथे एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

दुसरीकडे लग्न झाल्याने थेट पतीचा केला गेम!

दुसरीकडे लग्न झाल्याने थेट पतीचा केला गेम!

मुंबई तक

20 Dec 2025 (अपडेटेड: 20 Dec 2025, 11:09 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या तरुणासोबत लग्न झाल्याने थेट पतीचा केला गेम!

point

पुण्याच्या सासवडमध्ये एकतर्फी प्रेमातून धक्कादायक घटना

Pune Crime: पुण्याच्या सासवड येथून हत्येचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. खरं तर, आरोपीचं संबंधित महिलेच्या लग्नाआधीपासूनच तिच्यावर प्रेम होतं. पण, तिचं दुसऱ्या तरुणासोबत लग्न झालं आणि याच रागातून त्याने तिच्या पतीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

तरुणीवर एकतर्फी प्रेम...

14 डिसेंबर रोजी सासवडमध्ये एका दिपक जगताप नावाच्या तरुणाचा मृतदेह आढळला होता. एकतर्फी प्रेमातून आरोपीने पीडित दिपकचा खून केल्याची माहिती समोर आली. प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव सुशांत मापरे असून त्याचं मृताच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होतं. याच रागातून त्याने दिपकची निर्घृण हत्या केली. 

हे ही वाचा: छत्रपती संभाजीनगर : मूकबधीर सासऱ्याची निर्घृण हत्या करून मृतदेह गोदावरीत फेकला, कैद्याला फोटो दाखवताच गूढ उकलले

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या पतीचा केला गेम   

खरं तर, सुशांत हा मृताच्या पत्नीच्या लग्नापूर्वीच तिच्या मागे होता आणि तिचं लग्न झाल्यानंतर त्याने तिच्या पतीचा खून केला. सुशांतचं संबंधित महिलेवर प्रेम असल्याकारणाने त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. परंतु, तिचं दिपकसोबत लग्न झाल्याने त्याने रागाच्या भरात पीडित दिपकची हत्या केली. 

हे ही वाचा: उद्धव ठाकरेंचं राजकीय भविष्य आता मुंबईकरांच्या हातात, BMC निवडणुकीत पराभव झाला तर…

आरोपी सुशांतला अटक 

पीडित तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर, या प्रकरणाची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून त्वरीत तपास सुरू केला. तपासादरम्यान, त्यांना आरोपीविरुद्ध पुरावे सापडले आणि त्यांनी आरोपी सुशांतला ताब्यात घेतलं. सुशांतच्या अटकेनंतर त्याची कठोर चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपीने एकतर्फी प्रेमातून दिपकची हत्या केल्याचं कबूल केलं. आता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

    follow whatsapp