शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका

मुंबई तक

20 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:55 AM)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना हा टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी आज त्यांचा अयोध्या दौरा स्थगित केला त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना हा टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

राज ठाकरेंनी आज त्यांचा अयोध्या दौरा स्थगित केला त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की राज ठाकरेंनी दौरा पुढे ढकलला आहे, रद्द केलेला नाही. ते लवकरच अयोध्येला जातील आणि अयोध्येला जाणाऱ्यांचं स्वागत करावं ही आमची भूमिका आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारी विचारलेल्या प्रश्नाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवारांची भूमिका कधी कुणाला समजली आहे का? संभाजीराजेंना आम्ही आमच्या कोट्यातून खासदार केलं. मात्र त्यांना कधीही पक्षाचा प्रचार करायला लावला नाही. संभाजीराजेंना सहावी जागा का देत आहेत? त्यांना महत्त्वाची जागा द्यावी असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत प्रश्न विचारला असता नाना पटोलेंना स्मृतीभ्रंश झाला आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची आणि निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा व्यक्त केलेला आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. शरद पवारांच्या याच भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी आज टीका केली आहे.

    follow whatsapp