पालघर : लग्नात नियमांचा भंग केल्याप्रकरणी नवरदेवाच्या वडिलांना अटक

मुंबई तक

• 05:17 AM • 22 Feb 2021

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता, राज्य सरकारने रुग्णसंख्या वाढत असलेल्या भागात निर्बंध कडक केले आहेत. लग्न व इतर समारंभात नियमांचं उल्लंघन केल्यास पोलीस यंत्रणांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सरप्राईज व्हिजीटमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सातपती, शिरगाव, उमरोली बिरगाव या भागातील लग्नसोहळ्याला पाचशेपेक्षा जास्त लोकं हजर […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता, राज्य सरकारने रुग्णसंख्या वाढत असलेल्या भागात निर्बंध कडक केले आहेत. लग्न व इतर समारंभात नियमांचं उल्लंघन केल्यास पोलीस यंत्रणांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सरप्राईज व्हिजीटमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सातपती, शिरगाव, उमरोली बिरगाव या भागातील लग्नसोहळ्याला पाचशेपेक्षा जास्त लोकं हजर होती. यावर कारवाई करत असताना पोलिसांना नवरदेवाच्या वडिलांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – विनामास्क घराबाहेर पडताय? मग मुंबई पोलिसांच्या कारवाईला तयार रहा

महाराष्ट्र सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार लग्नसोहळ्याला फक्त ५० लोकांना हजर राहता येणार आहे. याचसोबत लग्नसोहळ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायजर वापरणं या सर्व गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मात्र पालघरमध्ये या नियमांचा सर्रास उल्लंघन होत असल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवाचे वडील, रेसॉर्टचे मालक, डीजे आणि केटरर्स यांच्यावर कारवाई केली आहे. या सर्वांवर पालघरमधील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही लग्न सोहळ्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. जळगाव शहरातील मंगलकार्यालयांची खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान जळगावमधील सहा मंगलकार्यालयांत कोरोनाच्या नियमांचं पालन होत नसल्याचं लक्षात आलं. या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सहा मंगलकार्यालय सील केली आहेत. दुसरीकडे राजगुरुनगमध्येही लग्नात गर्दी केल्याप्रकरणी रिसॉर्ट ओनरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अवश्य वाचा – कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात

    follow whatsapp