पंढरपूर: सावकाराच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या

मुंबई तक

• 05:21 AM • 06 Jan 2022

नितीन शिंदे, पंढरपूर: पंढरपूरमध्ये सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्याजासह मुद्दल देखील परत देऊन देखील सावकाराच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून संतोष प्रकाश साळुंखे या पंढरपूरमधील अनिलनगर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (3 जानेवारी) घडली होती. याप्रकरणी मंगळवारी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून बुधवारी सावकारास […]

Mumbaitak
follow google news

नितीन शिंदे, पंढरपूर: पंढरपूरमध्ये सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्याजासह मुद्दल देखील परत देऊन देखील सावकाराच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून संतोष प्रकाश साळुंखे या पंढरपूरमधील अनिलनगर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (3 जानेवारी) घडली होती. याप्रकरणी मंगळवारी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून बुधवारी सावकारास अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

शेखर दत्तात्रय कुंदरकर, सुवर्णा अंकुश बिडकर (वय 28 वर्ष) व अंकुश रामा बिडकर ( वय 35 वर्ष) सर्व यांच्याकडून संतोष साळुंखे यांनी व्याजाने पैसे घेतले होते. त्यांनी ते पैसे व्याजासह परतही केले होते.

तरीही वरील तिघांनी संतोषला व्याजाची जादा रक्कम देण्यासाठी बरीच मारहाण केली होती. तसेच संतोषकडून जबरदस्तीने घर विक्री केल्याबाबत नोटरीही करून घेतली होती. त्यामुळे संतोषला मानसिक व शारीरिक त्रास झाला होता. असे आरोप संतोषच्या कुटुंबीयांनी केले आहेत.

याच सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर संतोषने आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास वरील तिघांनी भाग पाडले असल्याची तक्रार पांडू साळुंखे यांनी पोलिसात दिली आहे. याप्रकरणी शेखर दत्तात्रय कुंदरकर याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुंड गजा मारणेची भीती घालून पैसे उकळणाऱ्या सावकाराला अटक

या संपूर्ण प्रकरणात संतोषला फक्त झोालेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागलं त्यामुळे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कोर्टाने त्यांनी शिक्षा ठोठवावी अशी मागणी साळुंखे कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी इतरही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp