Pankaja Munde : "मी बीडची लेक, मला बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर...", पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

मंत्री पंकजा मुंडे या आज नागूपरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. त्यांना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदांवरुन सरकारवर आलेल्या नामुष्कीवर विचारले असता, त्या म्हणाल्या नाशिक रायगड पालकमंत्री पद स्थगितीबद्दल मला काही कल्पना नाही.

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:42 AM • 20 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

जालन्याच्या पालकमंत्रिपदाबद्दल काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

point

पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद हवं होतं?

point

नाशिक, रायगडबद्दल काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, या निवडणुकीत 230 पार केलेल्या महायुतीला मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपद वाटण्यासाठी अनेक महिने लागले. त्यानंतर काल पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, त्यानंतरही काही ठिकाणी वाद कायम असल्याचं दिसतंय. रायगडमध्ये गोगावलेंना पालकमंत्रिपद हवंय, तर गिरीश महाजन यांच्या नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयलाही स्थगिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनीही आपल्याला बीड मिळालं असतं तर आनंद झाला असता असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

हे वाचलं का?

 
मंत्री पंकजा मुंडे या आज नागूपरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, माझ्या खात्यासंबधित पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी आज नागपूर मी आलीय. तसंच त्यांना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदांवरुन सरकारवर आलेल्या नामुष्कीवर विचारले असता, त्या म्हणाल्या नाशिक रायगड पालकमंत्री पद स्थगितीबद्दल मला काही कल्पना नाही. मात्र, जालन्याचं पालकमंत्रिपद मिळाल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय हे विचारलं असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे ही वाचा >>फडणवीस सरकारवर मोठी नामुष्की, महाजन-तटकरेंना मोठा धक्का.. पालकमंत्री पदाला स्थगिती

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी त्यावर अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मला जालना येथील पालकमंत्रिपद मिळालं. तिथून मला चांगला प्रतिसाद मिळतोय. मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव असं समजून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सारखं काम करायला मिळेल असं नाही. मी पूर्वी पाच वर्ष कोणत्याही पदावर नसताना पूर्ण वेळ संघटनेचे काम केलं असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे ही वाचा >>Dhananjay Munde: 'दादांना सांगितलेलं, पहाटेची शपथ घेऊ नका घात होतोय..', मुंडेंकडून गौप्यस्फोट

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी बीडची मुलगी असल्यानं जर मला बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं, तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती तर अजुन आनंद झाला असता. माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिला आहे. आत्ता झालेल्या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शविता मिळालेल्या संधीला जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार असं पंकजा मुंडे म्हणाल्या.  

दरम्यान, पुढे त्या असंही म्हणाल्या की, जालन्यावर डबल लक्ष मला द्यावं लागेल. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत, ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा मला विश्वास आहे.

    follow whatsapp