परमबीर सिंगच अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड-अनिल देशमुख

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच अँटेलिया प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसंच मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंडही परमबीर सिंगच आहेत असंही त्यांनी ईडीला दिलेल्या जबाबात स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी जेव्हा परमबीर सिंग यांना आम्ही विधान भवनात बोलावलं त्यावेळी त्यांनी योग्य […]

Mumbai Tak

दिव्येश सिंह

• 05:17 AM • 03 Feb 2022

follow google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच अँटेलिया प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसंच मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंडही परमबीर सिंगच आहेत असंही त्यांनी ईडीला दिलेल्या जबाबात स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी जेव्हा परमबीर सिंग यांना आम्ही विधान भवनात बोलावलं त्यावेळी त्यांनी योग्य माहिती दिली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी आम्ही दोघांनी मिळून परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यांची नियुक्ती होमगार्डचे संचालक म्हणून केली असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

Antilia Case : धुळीने माखलेल्या Scorpio च्या नव्या Number Plate कडे रिलायन्सच्या सुरक्षा प्रमुखाचं लक्ष गेलं अन..

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटेलिया या ठिकाणच्या रस्त्यासमोर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली कार सापडली. ही कार सापडताच सचिन वाझे तिथे कसे पोहचले? हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित झाला. त्यानंतर स्कॉर्पिओ गाडी कुणाची होती हा प्रश्न पुढे आला. ती गाडी मनसुख हिरेन यांची असल्याचं समोर आलं. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे व्यावसायिक संबंध होते ही बाब देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणली. इतकंच नाही तर मनसुख हिरेन यांना सुरक्षा पुरवली पाहिजे अशीही मागणी त्यांनी अधिवेशनात 5 मार्चला केली होती. त्यांनी ही मागणी केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. यानंतर या प्रकरणाने अनेक वळणं घेतली.

राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब मला देत होते, अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

20 मार्चला परमबीर सिंग यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हे सांगितलं की अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून 100 कोटी रूपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते. या लेटरबॉम्बमुळे एकच खळबळ उडाली होती. भाजपने यावरून सरकारवर प्रचंड टीकाही केली होती. आता अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबात या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाईंड परमबीर सिंग हेच आहेत असं म्हटलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी कोणत्या दिशेने जाणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

वाझेला सेवेत घेण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव होता; परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट

परमबीर सिंग यांचेही गंभीर आरोप

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देखील आपला जबाब ईडीपुढे नोंदवला. यावेळी सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लावले. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्यावर दबाव टाकून त्यांचा जबाब बदलण्यास सांगितले, असा जबाब परमबीर सिंग यांनी नोंदवला. तुरुंगात सचिन वाझेने त्याचा जबाब बदलावा यासाठी छळ करण्यात येत आहे, असेही सिंग यांनी म्हटले आहे. तुरुंगात सचिन वाझे यांचे कपडे काढले जातात आणि त्यांची चौकशी केली जाते असेही सिंग यांनी सांगितले.

    follow whatsapp