एक दिवसाचा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर

मुंबई तक

• 03:15 AM • 25 Mar 2022

पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये गुरूवारचा एक दिवस कोणतीही वाढ झाली नाही. मात्र हा दिलासा अवघा एक दिवसाचाच ठरला. कारण आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेल अशा दोहोंच्या दरात 83 पैसे वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून हे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. चार दिवसात […]

Mumbaitak
follow google news

पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये गुरूवारचा एक दिवस कोणतीही वाढ झाली नाही. मात्र हा दिलासा अवघा एक दिवसाचाच ठरला. कारण आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेल अशा दोहोंच्या दरात 83 पैसे वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून हे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. चार दिवसात 2.40 रूपयांची वाढ झाली आहे.

हे वाचलं का?

या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 97.81 रूपये प्रति लिटर झालं आहे, तर डिझेल 89.7 रूपये प्रति लिटर झालं आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 112.51 रूपये प्रति लिटर इतकं झालं आहे तर 96.70 रूपये प्रति लिटर इतकं झालं आहे.

22 आणि 23 मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 80 पैसे वाढ करण्यात आली होती. 22 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 137 दिवसांनी करण्यात आली होती. त्यानंतर कालचा दिवस वगळला तर चार दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.

देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये काय आहेत दर?

मुंबईत पेट्रोल 112.51 रूपये प्रति लिटर आहे, डिझेल 96.70 प्रति लिटर झालं आहे. दिल्लीत पेट्रोल 97.81 रूपये लिटर झालं आहे तर डिझेल 89.07 रूपये लिटर झालं आहे. चेन्नईत पेट्रोल 103.67 रूपये लिटर झालं आहे तर डिझेलचा दर 93.71 रूपये प्रति लिटर झाला आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 107.18 रूपये झाला आहे. तर डिझेलचा दर 92.22 रूपये प्रति लिटर झाला आहे.

देशात 4 नोव्हेंबर 2021 पासून 21 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आता मात्र ही वाढ करण्यात आली आहे. या काळात तेलाची किंमत प्रति बॅरल 82 डॉलरवरून 111 डॉलरवर पोहचली.

    follow whatsapp