भारतीय तेल कंपन्यांच्या वतीनं आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आज डिझेलचे दर 34 ते 38 पैशांनी, तर पेट्रोलचे दर 30 ते 35 पैशांनी वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या महागाईमुळं आधीच सर्वसामान्य त्रस्त आहेत, अशातच सातत्यानं वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर त्यांच्या चिंतेत आणखी भर घालत आहेत.
ADVERTISEMENT
देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 107.59 रुपये, तर डिझेलचे दर 96.32 रुपये प्रति लिटर आहेत. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत 113.46 रुपये आणि डिझेलची किंमत 104.38 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 108.11 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 99.43 रुपये प्रति लिटर आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 104.52 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 100.59 रुपये प्रति लिटर आहेत.
तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी…
एक मेसेज करून आपण आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी इंडियन ऑईलच्या एसएमएस सेवेचा वापर करता येईल. आपल्या मोबाईलवरून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवा लागणार आहे. RSP स्पेस देऊन पेट्रोल पंप डिलरचा कोड टाका आणि मेसेज सेंड करा. RSP कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर आपल्या मिळेल.
पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देता, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भीती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्या होऊ शकतात. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 60 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल.
ADVERTISEMENT
