“कमळाबाई आता ‘हात’ घाईवर” अशा मथळ्याखाली सामनात बातमी प्रसिद्ध झाली. या मथळ्यातील कमळाबाई शब्दावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलारांनी संपादक उद्धव ठाकरेंना इशारा दिला. शेलारांच्या इशाऱ्यानंतर ठाकरेंनी पुन्हा कमळबाई म्हणत भाजपला डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा एक गट बाहेर पडून भाजपत जाणार असल्याची चर्चा सुरूये. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्यानं चर्चेला उधाणच आलं. याचसंदर्भातील बातमी सामनात प्रसिद्ध झाली, पण बातमीच्या मथळ्यात भाजपचा उल्लेख कमळाबाई करण्यात आला.
उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनात भाजपला कमळाबाई म्हणून डिवचण्यात आलं. त्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार चांगलेच भडकले. आशिष शेलारांनी लागलीच ट्विट करत संपादक उद्धव ठाकरेंना इशारा दिला.
‘कमळाबाई’ला प्रत्युत्तर ‘पेग्विन सेना’; आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना काय इशारा दिला?
आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता आम्ही तुम्हाला पेग्विन सेना म्हणू असा पलटवार उद्धव ठाकरेंवर केला होता.
आशिष शेलारांनी एक छोटं पत्र ट्विट केलं होतं. हे पत्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलला टॅगही करण्यात आलं होतं.
उद्धव ठाकरे
संपादक, सामना
महोदय,
आपण आमच्या कमळाला हिणवायला ‘बाई’ म्हणताय? हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मी पण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता पेग्विन सेना म्हणायचे का?
ता.क.
असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत.
उद्धव ठाकरेंनी भाजपला पुन्हा डिवचलं
आशिष शेलारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. अखेर सामनात आज पुन्हा एकदा कमळाबाई म्हणत भाजपवर निशाणा साधण्यात आलाय.
आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे पप्पू?; ‘घोड्यावरून वराती’चे झळकावले बॅनर्स, शिंदे गटाने चढवला हल्ला
सामना पहिल्या पानावर शिंदे गटाबद्दलची बातमी असून, त्या बातमी मथळ्यातच कमळाबाई असा उल्लेख करण्यात आला आहे. ’40 फुटीरांचे कमळाबाईला टेन्शन, मंत्रिमंडळ विस्तारावरून फुस् फुस्… धुसफुस’, असं म्हणत शेलारांना उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय. त्यामुळे आता आशिष शेलार यावर काय भूमिका मांडणार, हे महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
