गेल्या काही वर्षांपासून CBI च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह – सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा

केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नेत्यांना केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून धमकावलं जात असल्याचा आरोप आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनीही केंद्रीय तपासयंत्रणा सीबीआयची कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तयार झालेलं असल्याचं महत्वपूर्ण विधान केलं आहे. सत्ता आणि सत्ताधारी हे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:12 PM • 01 Apr 2022

follow google news

केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नेत्यांना केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून धमकावलं जात असल्याचा आरोप आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनीही केंद्रीय तपासयंत्रणा सीबीआयची कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तयार झालेलं असल्याचं महत्वपूर्ण विधान केलं आहे.

हे वाचलं का?

सत्ता आणि सत्ताधारी हे बदलत असतात परंतू एक संस्था म्हणून तुम्ही कायम तिथेच राहणार आहात असं विधान रमण्णा यांनी केलं आहे. ते नवी दिल्ली येथील १९ व्या डी.पी.कोहली स्मृती चर्चासत्रात बोलत होते.

…तर शिवसैनिकाच्या वडापावच्या गाडीवरही ईडी कारवाई करेल, संजय राऊत यांचा खोचक टोला

“राजकीय सत्ता ही कालानुरुप बदलत असते, पण एक संस्था म्हणून तुम्ही कायम तिथेच राहणार आहात. त्यामुळे तुम्ही एक संस्था म्हणून अभेद्य आणि स्वतंत्र राहणं गरजेचं आहे. तुम्ही करत असलेल्या कामाशी एकजुट राहण्याची शपथ घ्या. तुमच्यातला बंधुभाव-एकता हीच तुमची ताकद आहे. सुरुवातीच्या काळात जनतेच्या मनात सीबीआयबद्दल प्रचंड आदर आणि विश्वास होता. परंतू गेल्या काही वर्षांपासून सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.”

सध्याच्या घडीला न्यायव्यवस्थेकडे एखाद्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी अनेक अर्ज दाखल होत आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये इतर संस्थेप्रमाणेच सीबीआयची विश्वासार्हता धोक्यात आली आहे, असंही रमण्णा म्हणाले. मला आठवत की काही वर्षांपूर्वी सीबीआयचे अधिकारी एखाद्या प्रकरणाचा तपास कऱण्याआधी पत्रकार परिषद घ्यायचे. परंतू सध्याच्या नेतृत्वाखाली सीबीआयचे अधिकारी आपला तपास लो-प्रोफाईल ठेवत आहेत, हे खरंच चांगलं आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.

अनिल देशमुखांविरोधातल्या तपासाला खीळ बसण्यासाठी राज्य सरकारचे ‘निर्ल्लज’ प्रयत्न सुरू-सीबीआय

CBI, ED, SFIO यासारख्या अन्य केंद्रीय तपासयंत्रणांना एका छत्राखाली आणणं गरजेचं असल्याचं मतही यावेळी रमण्णा यांनी बोलून दाखवलं. पोलिसांसह सर्व तपासयंत्रणांनी लोकशाही मूल्य बळकट करणं गरजेचं असल्याचं मतही रमण्णा यांनी बोलून दाखवलं. महाराष्ट्रासह पश्चिम बंगालमध्ये सध्या केंद्रीय तपासयंत्रणांकडून होत असलेली कारवाई चर्चेचा विषय ठरत असतानाच सरन्यायाधीशांनी केलेल्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे.