पुण्याची गोष्ट : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मिसिंग लिंकला देवेंद्र फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंक असे म्हटले आहे. मात्र अशातच या मिसिंग लिंकला राज्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी सरकारकडे मागणी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन जारी केले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं, आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर; तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात
जगातील सर्वाधिक रूंद पूल अशी ओळख
खंडाळा घाटातील सततच्या वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण व्हायची, तसेच वाहन पलटी होऊन अपघात व्हायचे. याचपार्श्वभूमीवर तोडगा म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाची बांधणी करण्यात आली. यामुळे आता प्रवासी अर्धा तास आधी पुणे-मुंबई तसेच मुंबई-पुणे लवकर पोहोचतील. जगातील सर्वाधिक रूंद पूल अशी या पूलाची ओळख आहे.
दरम्यान, या प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते याच्या अंमलबजावणीपर्यंत दिवंगत अजितदादांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून आपले काम चोख केले. विशेष म्हणजे 2025-26 या अर्थसंकल्पात चांगला निधी देऊन या प्रकल्पाला गती देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या प्राशासकीय कामांना त्यांच्यामुळेच वेग आला होता, असे देखील पुढे ते म्हणाले.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ, बायकोचे 'ते' Video पाहून नवऱ्याने...
दिपक खैरनार यांच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार?
सामान्य जनतेचा प्रवास सुरक्षित व्हावा, हीच अजितदादांची भूमिका होती. मिसिंग लिंक हा त्यांच्या कार्याचा अगदीच जिवंत पुरावा आहे. म्हणूनच या प्रकल्पाला त्यांचे नाव देणे ही त्यांना खरी आदरांजली असणारे आहे, असे दिपक खैरनार म्हटले होते. दिपक खैरनार यांच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेतील हे लवकरच कळेल.
ADVERTISEMENT











