ADVERTISEMENT
Pune Metro : लग्नाच्या तयारीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू आणि त्यामागे उलगडत गेलेले कटकारस्थान यामुळे पुणे हादरले आहे. 25 वर्षीय केतन अग्रवाल आणि 20 वर्षीय सिया गोयल यांचा साखरपुडा झाला होता आणि दोघांचे लग्नही निश्चित झाले होते. कुटुंबीयांच्या उपस्थितीत भविष्यासाठी प्लॅनिंग केलं जात होतं. त्याच दरम्यान बाली ट्रिपचा एक प्रसंग घडला होता. प्रवासासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर सियाने स्वतःचा पासपोर्ट फाडून टाकल्याचा तपासात उल्लेख आहे. त्यामुळे संपूर्ण ट्रिप रद्द झाली आणि सर्वजण पुण्यात परतले. या घटनेनंतरही लग्नाच्या तयारी सुरू राहिल्या. दोन्ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रतिष्ठित असल्याने लग्न सोहळाही शाही थाटात होणार होता. मात्र या नात्याच्या आड एक वेगळीच कथा सुरू होती, ज्याचा शेवट एका भीषण गुन्ह्यात झाल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : Monsoon Update: अखेर ‘तो’ आला... मुंबईकर सुखावले, कुठे रेड आणि ऑरेंज अलर्ट?
लोहगड किल्ल्यावर ट्रेकसाठी गेल्यानंतर थंड डोक्याने मर्डर
तपासानुसार सिया गोयल आणि 22 वर्षीय चेतन चौधरी यांचे प्रेमसंबंध होते. दिवाळीच्या सुमारास दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले. मात्र दरम्यान सियाचे लग्न केतन अग्रवाल याच्याशी ठरले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, केतन हा त्यांच्या प्रेमसंबंधांमधील अडथळा ठरत असल्याची भावना दोघांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातूनच कट रचल्याचा आरोप आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकसाठी गेलेल्या भेटीदरम्यान केतनला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर पुन्हा एकदा प्री-वेडिंग शूटच्या निमित्ताने लोहगडला जाण्याचा बेत आखण्यात आला. 18 जून रोजी सिया आणि केतन किल्ल्यावर गेले असताना चेतन चौधरी आधीच तेथे पोहोचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा : निधीचं सत्य मांडलेल्या 'मुंबई Tak' चं नाव घेतलं; ओमराजे निंबाळकर तात्काळ कॅमेऱ्यासमोर आले अन्...
सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे मानले गेले. किल्ल्यावरून पडल्यामुळे केतनचा मृत्यू झाल्याची माहिती सियाने दिली होती. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र तपासादरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर येऊ लागल्या. पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक पुरावे तपासले असता सिया आणि चेतन यांच्यात सातत्याने संपर्क असल्याचे आढळले. जानेवारीपासून जूनपर्यंत दोघांमध्ये तब्बल 2,004 फोन कॉल झाल्याची माहिती समोर आली. तसेच अनेक तास दोघांमध्ये संभाषण झाले होते. 18 जूनच्या दिवशी चेतनच्या मोबाईलचे इंटरनेट दीर्घकाळ बंद होते, तसेच त्याचा मोबाईल दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर तपासाची दिशा बदलली आणि दोघांवर संशय अधिक बळावला.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील धागेदोरे एकमेकांशी जोडले गेले. तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी कट रचल्याचा आरोप समोर आला. पोलिसांच्या मते, केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावर नेऊन कड्यावरून ढकलण्यात आले. सुरुवातीला अपघात वाटणारे हे प्रकरण नंतर पूर्वनियोजित खुनात परिवर्तित झाले. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला असून समाजातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लग्न करायचे नसल्यास त्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी खुनाचा मार्ग निवडल्याचा आरोप या प्रकरणात केला जात आहे. सध्या दोन्ही आरोपींविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पोलिस तपासातून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











