Ramgiri Maharaj Statement in Sambhajinagar : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले रामगिरी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोझोन मॉलमध्ये मिशन अयोध्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी रामगिरी महाराज आले होते, यावेळी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
प्रत्येक चित्रपटाच्या सुरूवातीपूर्वी राष्ट्रगीत वाजवलं जातं तसं राष्ट्रगीत इथेही वाजवलं गेलं. त्यावेळी रामगिरी महाराज म्हणाले हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये जॉर्ज पंचम यांना खूश करण्यासाठी गायलं होतं. रामगिरी महाराज म्हणतात की, जॉर्ज पंचमने हिंदुस्थानवर खूप अत्याचार केले आणि त्यावेळी त्याच्या समर्थनात, त्यांची स्तुती करताना हे गीत गायलं गेलं, त्यामुळे हे गीत राष्ट्राला समर्पित नाही. त्यामुळे वंदे मातरम हेच खऱ्या अर्थानं राष्ट्रगीत आहे असं रामगिरी महाराज म्हणाले.
हे ही वाचा >> Asaram Bapu Bail : बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जामीन, तरीही तुरूंगाबाहेर येता येणार नाही?
रामगिरी महाराज म्हणाले, रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षणक्षेत्रात मोठं कार्य आहे. पण शिक्षण संस्थेतील लोकांना राजकीय लोकांशी समतोल राखावा लागतो. ब्रिटीश काळात ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या, त्यांना ब्रिटीशांना धरून चालावं लागत होतं, म्हणून त्यांनी ब्रिटीशांची स्तुती केली आणि त्यामुळेच त्यांना नोबल मिळाला असं रामगिरी महाराज म्हणाले.
आपल्याला शैक्षणिक संस्थांद्वारे चुकीचं शिक्षण दिलं गेलं. आम्ही रामाचे कृष्णाचे वंशज आहोत. पण इतिहासात आमचे पूर्वज आर्य होते आणि ते पाश्चिमात्य देशांतून आले होते, असं सांगण्यात आलं. रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, पूर्वी साधू-संतांना चित्रपटांमध्ये महत्त्व दिलं जात नव्हतं, परंतु आज साधू-संतांना चित्रपटांमध्ये महत्त्व दिलं जातं. पूर्वी सनातन धर्माची आणि हिंदूंची चित्रपटांतून बदनामी होत होती.
हे ही वाचा >> Mumbai Crime News : चोरी करायला घरात घुसला चोर, काहीच नाही मिळालं म्हणून महिलेचा मुका घेऊन पळाला...
बाहेरून आलेल्या बाबर आणि गझनी यांनी देशात खूप अत्याचार केले. अनेक हिंदूंची हत्या केली आणि स्त्रिया विकत घेतल्या. औरंगजेबाने या संभाजीनगर शहरात खूप अत्याचार केले, अनेक मंदिरं पाडली आणि मशिदी बांधल्या. आणि आम्हाला शाळेत शिकवले होतं की कोणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल सुद्धा द्यावा. पण तसं न करता कुणी एक मारली तर दोन मारा असं रामगिरी महाराज म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
