क्रौर्याचा कळस! लग्नाला नकार दिल्याने तरूणीवर बलात्कार, मुंडकं धडावेगळं करत केली हत्या

मुंबई तक

• 10:31 AM • 26 Feb 2022

तरूणीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचं मुंडकं धडावेगळं करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या नराधम श्रीमंत कुटुंबातील आहे. त्याला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या नराधमाला त्या तरूणीने लग्नाला नकार दिला होता म्हणून त्याने हे क्रूर कृत्य केलं. जाहिर जफर असं या […]

Mumbaitak
follow google news

तरूणीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचं मुंडकं धडावेगळं करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या नराधम श्रीमंत कुटुंबातील आहे. त्याला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या नराधमाला त्या तरूणीने लग्नाला नकार दिला होता म्हणून त्याने हे क्रूर कृत्य केलं.

हे वाचलं का?

जाहिर जफर असं या नराधमाचं नाव आहे. ही घटना पाकिस्तानातल्या इस्लामाबादमध्ये घडली आहे. पाकिस्तानच्या एका ट्रेडिंग कंपनीत त्याचे वडील संचालक म्हणून काम पाहतात. पाकिस्तानात या जाहिर जफरचं कुटुंब अत्यंत श्रीमंत कुटुंबापैकी एक मानलं जातं. या नराधमाने एका तरूणीवर तिच्या घरात बलात्कार केला. या तरूणीने जाहिर जाफरला लग्नाला नकार दिला होता त्यामुळे त्याने हे क्रूर कृत्य केलं. 27 वर्षीय तरूणीचं नाव नूर मुकद्दम होतं. २० जुलै २०२१ ला जाहिरने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली.

आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम मुलाला नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेप

या प्रकरणी जाहीर जफरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावली जावी यासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं. या प्रकरणात जाहीरच्या दोन सुरक्षा रक्षकांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जाहीरच्या आई वडिलांना या प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे.

या प्रकरणाची पाकिस्तानात खूप जास्त चर्चा झाली होती. महिला कार्यकर्त्यांनी आंदोलनं करून नराधमाला फाशी दिली जावी अशी मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी घेतानाही काहीसा दबाव होता. महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणााऱ्या अस्मा जहांगीर लीगल अँड सेलने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात होणाऱ्या महिला अत्याचारांनंतर जे दोषी सिद्ध होतात त्यांचं प्रमाण अवघं तीन टक्के आहे. तर पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने दिलेल्या एका अहवालानुसार दर वर्षी खोटी प्रतिष्ठा राखण्याच्या नादात एक हजाराहून जास्त महिलांना त्यांचे प्राण गमाववे लागतात.

नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार

डेलि मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार या प्रकरणात नूर मुकद्दमचे वडील म्हणाले की आम्हाला न्याय मिळाला आहे. आता आम्ही जफरच्या आई वडिलांना शिक्षा मिळावी यासाठी अपील करणार आहोत. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये हेदेखील दिसून येतं आहे की नूर पळण्याचा प्रयत्न करत होती, तरीही जाहिरच्या स्टाफने तिला थांबवलं. गेट मोठं होतं आणि नूर ठरवूनही पळ काढू शकली नाही.

    follow whatsapp