मुंबई तकः उद्योगपती रतन टाटा यांनी आज कोव्हिड ची लस घेतली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसंच या ट्विटमध्ये इतरांनाही लवकरात लवकर लस मिळेल आणि कोव्हिड विरोधात त्यांना संरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
रतन टाटा यांनी कोव्हिडच्या लसीचा पहिला डोस आज घेतला आहे. याबाबतची माहित देताना रतन टाटा म्हणतात “पहिला लसीचा डोस घेतला त्याबद्दल मी आभारी आहे. हे अत्यंत वेदनारहीत आणि सहज झालं. प्रत्येकाला लवकरच लस मिळेल आणि सुरक्षा मिळेल” अशा शब्दात त्यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी गुरुवारीच मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली.
ADVERTISEMENT
