Sanjay Gaikwad: “सत्तेची पर्वा नाही, सत्तेला लाथ मारू”; बंडखोर आमदाराचा किरीट सोमय्यांना इशारा

मुंबई तक

• 01:29 PM • 08 Jul 2022

बुलढाणा: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी (Kirit Somaiya) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जहरी टीका केली, विविध आरोप केले. त्याने आता शिंदे गटातीलआमदार संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) बंड केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील बंडखोर गटाने सरकार स्थापनकेले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी किरीट सोमय्या यांना खडे बोल सुनावले आहेत. आम्ही […]

Mumbaitak
follow google news

बुलढाणा: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी (Kirit Somaiya) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जहरी टीका केली, विविध आरोप केले. त्याने आता शिंदे गटातीलआमदार संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) बंड केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील बंडखोर गटाने सरकार स्थापनकेले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी किरीट सोमय्या यांना खडे बोल सुनावले आहेत. आम्ही बाहेर पडलोयाचा अर्थ असा समजू नका की बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल श्रद्धा संपली. त्यामुळे किरीट सोमय्या यांनीबेताल वक्तव्य थांबवावी, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, सत्तेला लाथ मारू असे वक्तव्य आमदार गायकवाडांनी केले आहे.

हे वाचलं का?

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल आभार मानतोअशा शब्दात टीका केली होती. यावरच शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे आताभाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आमदार गायकवाड म्हणाले, ‘‘किरीट सोमय्यांनी असं काही समजू नये, की आता शिवसेना संपली. ही तीच शिवसेना आहे व आम्हीसत्तेत भाजपा-शिवसेना युती म्हणून काम करतोय. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे व उद्धव साहेबांबद्दल आमचीश्रद्धा नाही, असा समझ किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. यापुढे त्यांनी असे बेताल वक्तव्ये करू नयेत. अन्यथा, आम्हाला सत्तेचीपर्वा नाही‘‘, असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिला आहे.

आरे कारशेड आंदोलनासाठी परदेशातून पैसा आणला, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

दरम्यान किरीट सोमय्या यांनी मागेही ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर ठाकरे सरकारमधील डर्टी डझन म्हणूनएक यादीही दिली होती. रश्मी ठाकरे यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी टीका केली होती. २५ वर्षाच्या युतीमधून बाहेर पडल्यानंतरभाजप आणि शिवसेनेत टोकाचे मतभेद पाहायला मिळाले होते. शिंदे गटातील आमदारांनी ही कधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेयांच्यावर टीका केली नाही.

    follow whatsapp