सैराट फेम रिंकू राजगुरु ही लवकरच आपल्याला बॉलिवूडच्या सिनेमामध्ये दिसणार आहे. झुंड सिनेमात रिंकूने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. तर आता अजून एका दिग्गज कलाकारासोबत रिंकू सिनेमात काम करणार आहे. अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत रिंकू काम करणार आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्यासोबत त्यांच्या प्रोजक्टमध्ये काम करतेय. सार्थक दासगुप्ता त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटोस आणि व्हिडीयोस शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये अमोल पालेकर दिसतायत. अमोल पालेकर यांचा पोशाख पाहून ते वकिलांची भूमिका साकारत असल्याचं दिसतंय. तर यापूर्वी त्यांनी रिंकूचा फोटोही शेअर केला होता ज्यामध्ये ती कोर्टात बसलेली होती.
मुंबईतील लाइमलाइट स्टुडियओत या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. दरम्यान अजूनही या सिनेमाचं नाव अजून समोर आलेलं नाही. मात्र यामध्ये रिंकू राजगुरु आणि अमोल पालेकर एकत्र काम करणार आहेत.
रिंकूने नुकतंच छूमंतर या मराठी चित्रपटाचं शूटींगही लंडनमध्ये पूर्ण केलंय. या मराठी चित्रपटात रिंकूसोबत सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना तसंच अभिनेत्री प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन समीर जोशी यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
