PFIच्या निशाण्यावर होते RSS-BJP चे नेते; संघ मुख्यालयावर हल्ला करण्याची होती योजना- महाराष्ट्र ATS

मुंबई तक

• 10:46 AM • 26 Sep 2022

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) नुकतेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारी केली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीसह 11 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. चौकशी दरम्यान तपास यंत्रणेने अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. दरम्यान, पीएफआयबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयच्या रडारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) नुकतेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारी केली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीसह 11 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. चौकशी दरम्यान तपास यंत्रणेने अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. दरम्यान, पीएफआयबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयच्या रडारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे अनेक बडे नेते होते. यासोबतच नागपूरचे आरएसएसचे मुख्यालयही त्यांच्या निशाण्यावर होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयला आरएसएस आणि भाजप नेत्यांवर हल्ला करायचा होता. या संघटनेच्या काही सदस्यांनी दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाची माहितीही गोळा केली होती.

एनआयएने छापेमारीत शेकडो जणांना घेतलं ताब्यात

एनआयएच्या छाप्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही अनेकांना अटक करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतूनही 3 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून पीएफआयच्या एका सदस्याला अटक करण्यात आली. एनआयएने राजस्थानच्या जयपूरमध्येही छापे टाकले. मध्य प्रदेशातील इंदूर आणि उज्जैन येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले.

एनआयएच्या छाप्याच्या कारवाईमुळे पीएफआय संतप्त

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी या छाप्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या छाप्यांविरोधात पीएफआयने केरळमध्ये बंद पुकारला होता. या बंददरम्यान केरळमधील काही शहरांतून हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. पीएफआय समर्थकांकडून बस आणि कारची तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तमिळनाडूमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

”आम्ही कधीही निवडणूक लढवत नाही”

स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) वर बंदी घातल्यानंतर बाहेर आलेल्या PFI ने स्वतःला एक संघटना म्हणून घोषित केले. पीएफआय कार्यकर्त्यांच्या मते, ही संघटना अल्पसंख्याक, दलित आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी लढते. तथापि, पीएफआयने स्वतः कधीही निवडणूक लढविली नाही. ही संस्था आपल्या सदस्यांच्या नोंदी ठेवत नाही. त्यामुळेच तपास यंत्रणांना त्याच्याशी संबंधित लोकांना अटक करणे कठीण झाले आहे.

तपास एजन्सीला आधीपासूनच पीएफआयवर संशय

2017 मध्ये, हादिया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, एनआयएने दावा केला होता की पीएफआयने लोकांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्याचे काम केले आहे. तथापि, 2018 मध्ये, तपास यंत्रणेने मान्य केले की पाीएफआयने धर्मांतरासाठी कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. NIA ने मे 2019 मध्ये PFI च्या अनेक कार्यालयांवर छापे टाकले. इस्टर बॉम्बस्फोटांच्या मास्टरमाईंडचा संबंध पीएफआयशी असल्याचा संशय एजन्सीला होता.

    follow whatsapp